Cm Eknath Shinde-Abdul Sattar News
Cm Eknath Shinde-Abdul Sattar NewsSarkarnama

Aurangabad : मुख्यमंत्री शिंदे सत्तारांवर मेहरबान, सुतगिरणीसाठी १५ कोटी मंजुर..

मतदारसंघासाठी कोट्यावधींचा निधी मिळवत सत्तारांनी बाजी मारली असली तरी आता त्यांना शिंदे मंत्रीमंडळात सरप्राईज गिफ्ट मिळणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. (Abdul Sattar)

औरंगाबाद : माजीमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भलतेच मेहरबान झाले आहेत. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील विकास कामांसाठी शिंदे यांनी सत्तारांना (Abdul Sattar) भरघोस निधी दिला. एवढेच नाही, तर सत्तार यांनी मतदारसंघात सुतगिरणी उभारणीसाठी निधी मिळावा म्हणून गेली दोन-अडीच वर्ष पाठपुरावा केला होता. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ज्या सुतगिरणीला मंजुरी मिळाली नाही, त्या सुतगिरणीला (Eknath Shinde) शिंदे मुख्यमंत्री होताच मंजुरी मिळाली आणि १५ कोटींचा निधीही.

मतदारसंघात कोट्यावधींचा निधी आणि प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने सत्तार सध्या शिंदे यांचे कौतुक करतांना थकत नाहीयेत. (Marathwada) शुक्रवारी मुंबईत झालेल्या शक्तीप्रदर्शन व सत्कार सोहळ्यात अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कौतुकाचा अक्षरशः पाऊस पाडला होता. त्यामुळे यापुढे सत्तार यांच्या पदरात अजून काय काय पडते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जिथे जातो तिथे सत्ता येते असा दावा करत आपल्या नावातच सत्ता असल्याची शेखी सत्तार नेहमी मिरवत असतात. पण त्यांचा राजकीय प्रवास पाहिला तर ते काही अंशी खरेही ठरते. काॅंग्रेस, शिवसेना आणि आता शिवसेना शिंदे गट असा त्यांचा प्रवास पाहिला तर ते दिसून येते. राज्यात काॅंग्रेसची सत्ता असतांना सत्तार कॅबिनेट मंत्री होते. लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेतील उमेदवारीवरून सत्तारांचे अशोक चव्हाण व इतर वरिष्ठ नेत्यांशी खडके उडाले आणि त्यांनी हाताची साथ सोडली.

भाजपचे कमळ हाती घेण्याचा त्यांच्या प्रयत्न होता, पण तो फसला आणि भाजप नेत्यांच्या सल्यानेच त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. मतदारसंघावर मजबुत पकड असल्यामुळे ते निवडून आले आणि युतीचे सरकार येऊन ते कॅबिनेट मंत्री होतील असे वाटत असतांनाच शिवसेना-राष्ट्रवादी-काॅंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. तीन पक्षांच्या घाईगर्दीत सत्तारांचे कॅबिनेट हुकले पण त्यांना महसुल आणि ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले.

Cm Eknath Shinde-Abdul Sattar News
Bhumre : आधी लोक फोनवर वेडवाकडं बोलायचे, आता म्हणतात योग्य निर्णय घेतलात..

या मंत्रीपदाचा मतदारसंघातील कामे करून घेण्यात त्यांना फारसा फायदा झाला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचा असतांना देखील आपल्याला निधी मिळाला नाही, विकासकामे रखडली असा ठपका ठेवूनच ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडले. आता सत्तार यांचा योग असा की तेच शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे अलीबाबाची गुहा उघडावी असेच काहीसे सत्तार यांच्या बाबतीत घडतांना दिसत आहे. शिंदे यांनी सत्तार यांच्यासाठी जणू तिजोरीच उघडी केली असे वाटावे इतका निधी त्यांना मिळाला आहे.

मतदारसंघातील सिंचनाचे, रस्ते विकासाचे काम अवघ्या आठवडाभरात मार्गी लागली. सगळ्या महत्वाचा आणि सत्तार यांचा महत्वकांक्षी असा सुतगिरणीचा प्रकल्प देखील शिंदे यांनी झटक्यात मार्गी लावला. सुतगिरणीला मंजुरी व १५ कोटींचा निधी देत मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना गिफ्ट दिले. आता शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सत्तार यांच्या निशीबी पुन्हा सत्तेचा योग आला आहे. मतदारसंघासाठी कोट्यावधींचा निधी मिळवत सत्तारांनी बाजी मारली असली तरी आता त्यांना शिंदे मंत्रीमंडळात सरप्राईज गिफ्ट मिळणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com