Aurangabad : भाजपचे मिशन लोकसभा अन् फडणवीसांना ताप..

Bjp : नड्डा, फडणवीस यांची जाहीर सभा व त्याला हजारोंची गर्दी जमवत भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार होते.
Bjp Rally In Aurangabad News
Bjp Rally In Aurangabad NewsSarkarnama

Marathwada Political : भाजपने लोकसभा प्रवास योजने अंतर्गत २०२४ चे मिशन हाती घेतले आहे. आज मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथून भाजपच्या लोकसभा मिशनला प्रारंभ होणार होता. गेल्या कित्येक दिवसांपासून या मिशनची व त्यानिमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू आहे. (Marathwada) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची जाहीर सभा देखील होत आहे. परंतु या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार नाहीत.

Bjp Rally In Aurangabad News
High Court : राज्यात सरपंचाला दोन मत देण्याच्या अधिकाराला आव्हान..

फडणवीस यांना ताप भरल्यामुळे ते सभेला उपस्थितीत राहू शकणार नाहीत. चंद्रपूर येथे देखील नड्डा यांच्या उपस्थीतीत झालेल्या सभेला फडणवीस येवू शकले नव्हते. त्यापाठोपाठ आता (Aurangabad) औरंगाबादेत देखील फडणवीस (Devendra Fadanvis) असणार नाहीत. फडणवीसांना ताप भरल्यामुळे नड्डांची सभा यशस्वी करण्याचे मोठे आव्हान भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांपुढे असणार आहे.

सभा सुरू होण्याला अवघे काही मिनिटे उरली असतांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान अर्धे रिकामे असल्याची माहिती आहे. शहर व ग्रामीण भागातून देखील या सभेसाठी मोठी गर्दी जमवण्याचे प्रयत्न केले गेले. आता फडणवीसच सभेला येणार नाही म्हटल्यावर गर्दी आणखी घटण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील यापुर्वी शिवसेनेकडे असलेल्या सर्वच लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. मिशन लोकसभेची सुरूवात म्हणून आजच्या सभेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे नड्डा, फडणवीस यांची जाहीर सभा व त्याला हजारोंची गर्दी जमवत भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार होते.

परंतु फडणवीस हेच सभेला येणार नसल्यामुळे भाजपच्या शक्तीप्रदर्शनाला फटका बसणार आहे. चंद्रपूरमधील सभेला फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. १०३ ताप असल्यामुळे इच्छा असून देखील त्यांना नड्डा यांच्या सभेला हजर राहता आले नाही. त्यांनी तशी विनंती करून अध्यक्ष नड्डा यांची क्षमा देखील मागितल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com