Aurangabd : भाजपचा स्थापना दिवस, अन् उत्साही बागडेंची बाईक स्वारी..

बागडे यांना देखील बाईक चालवण्याचा मोह आवरला नाही आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पठाडे यांना पाठीमागे बसवून बागडे यांनी स्वःत बाईक चालवली. (Haribhau Bagde)
Bjp Leader Haribhau Bagde
Bjp Leader Haribhau BagdeSarkarnama

औरंगाबाद : वय वर्ष ७७ तरी उत्साह दांडगा असलेले फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde)आज एका वेगळ्याच रुपात दिसले. भाजपच्या (Bjp) स्थापना दिनानिमित्त मतदारसंघात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत रखरखत्या उन्हात बागडे नाना सहभागी झाले. (Aurangabad) नुसते सहभागीच झाले नाही तर शेंद्रा ते करमाडपर्यंत त्यांनी स्वःत बाईकही चालवली.

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या पारा ४१ अंशावर पोहचला आहे. दुपारच्या रखरखत्या उन्हात अंगाचा काहीली होत असल्याने नागरिक घरातच बसून राहणे पंसत करतात. पण केंद्रासह देशाच्या बहुतांश राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप या पक्षाचा आज स्थापना दिवस असल्याने भाजपचे जिल्ह्यातील सगळेच नेते आणि पदाधिकारी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.

हरिभाऊ बागडे हे जनसंघापासूनचे कार्यकर्ते, त्यामुळे आज आपल्या पक्षाचा देशभरात झालेला विस्तार पाहता त्यांचा उत्साह वाढणे सहाजिकच होते. औरंगाबाद पुर्व आणि आता फुलंब्री मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बागडे नाना फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विधीमंडळाच्या सर्वोच्च पदावर देखील विराजमान होते.

विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. राजकारणात वय नसते हे दाखवणारा आजचा त्यांचा उत्साह पाहून सगळेच चकीत झाले. भाजपच्या स्थापना दिना निमित्त तिकडे दिल्लीच्या पक्ष कार्यालयात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. तर ईकडे शहर आणि ग्रामीण भागात स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन आज केले होते. हरिभाऊ बागडे यांनी देखील आपल्या फुलंब्री मतदारसंघात बाईक रॅलीचे आयोजन केले होते.

Bjp Leader Haribhau Bagde
राष्ट्रपती, पंतप्रधान व दहा कोटी सदस्य असलेल्या भाजपचा सदस्य असल्याचा मला अभिमान..

दुपारी शेंद्रा ते करमाड अशीही वाहन रॅली काढण्यात आली. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या बाईकवर भाजपचा झेंडा लावून सहभागी झाले होते. बागडे यांना देखील बाईक चालवण्याचा मोह आवरला नाही आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पठाडे यांना पाठीमागे बसवून बागडे यांनी स्वःत बाईक चालवली. शेंद्रा ते करमाड अशी सात ते आठ किलोमीटर बाईक चालवतांना बागडे भाजपच्या घोषणा देखील देत होते. त्यांचा हा उत्साह पाहून मतदारसंघातील लोक देखील भारावून गेले.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती तेव्हा, बागडे यांचे वाढते वय पाहता त्यांना आराम द्यावा, असा एक मतप्रवाह पक्षात होता. पण बागडे यांनी उमेदवारीच खेचून आणली नाही तर विजय देखील मिळवला. आता वय वर्ष ७७ असतांना त्यांचा हा उत्साह पाहून २०२४ मध्ये देखील बागडे उमेदवारीवर दावा सांगतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असे झाले तर मग मात्र आतापासून गुडघ्याला बाशिंग बाधून बसलेल्या भावी उमेदवारांची मात्र पंचाईत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com