Aurangabad : भाजप पाणी प्रश्नावर आक्रमक ; फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लवकरच मोर्चा

फडणवीसांनी मंजुर केलेली पाणी योजना महाविकास आघाडी सरकारने बदलली आणि त्यामुळे ती रखडली हे सांगण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरू आहे. (Aurangabad)
Aurangabad : भाजप पाणी प्रश्नावर आक्रमक ; फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लवकरच मोर्चा
Bjp Leader Devendra FadanvisSarkarnama

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून पाण्याचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे. (Bjp) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल माध्यमांशी बोलतांना शहरवासियांच्या पाण्यासाठी आपण १६८० कोटींची पाणी योजना मंजुर केली होती, पण या नाकर्त्या सरकारने ती बदलली आणि महापालिकेला ६०० कोटी भरण्यास सांगितले. त्यामुळे हे काम रखडल्याचा आरोप केला होता. (Shivsena)

आता याच मुद्यावर अधिक आक्रमक होत फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत ५० हजारांचा मोर्चा काढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. (Aurangabad) भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनीच ही माहिती दिली असून २० मे पु्र्वी पाणी प्रश्नावरचा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबादकरांना आठ दिवसाआड पाणी मिळते.

गेल्या महिनाभरात पाण्यासाठी भाजपने दोनदा आक्रमक होत आंदोलन केले. महापालिका प्रशासकांच्या बंगल्यावर मोर्चा काढला, सिडकोतील पाण्याच्या टाकीसमोर आंदोलन केले. काल दोन दिवसांपुर्वी झालेल्या आंदोलनात भाजपने मनसेलाही सोबत घेतले होते. ६ दिवसांना पाणी पुरवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपने माघार घेतली होती.

परंतु ही माघार तात्पुर्ती होती, शिवसेनेची कोंडी करून फडणवीसांनी मंजुर केलेली पाणी योजना महाविकास आघाडी सरकारने बदलली आणि त्यामुळे ती रखडली हे सांगण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरू आहे. आता औरंगाबादकरांना देखील हे पटवून देण्यासाठी भाजपने पाणी प्रश्नावर मोर्चा काढण्याचाच निर्णय घेतला आहे.

Bjp Leader Devendra Fadanvis
साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या लढ्याला यश; फडणवीसांकडून राणा पाटलांचे अभिनंदन

देवेंद्र फडणवीस हे स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. महापालिकेत २५ वर्ष शिवसेनेसोबत सत्ता उपभोगल्यानंतरही भाजप शहराच्या पाणी प्रश्नासाठी एकट्या शिवसेनेला दोष देत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी सरकारने योजना बदलल्यानंतर ज्या कासवगतीने काम सुरू आहे, ते पाहता आणखी वर्षभर तरी औरंगाबादकरांना पाणी मिळण्याची शक्यता नाही. यावरून आता भाजपनेही शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या निमित्ताने चालवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.