Aurangabad : खंडपीठाचे आदेश, तरी तीन दिवसाआड पाण्यासाठी लागणार दोन महिने

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Aurangabad Municipal Corporation)
Water Supply Issue News, Aurangabad
Water Supply Issue News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शहराला तीन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad High Court) महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली असली तरी तीन दिवसाआड पाणी देण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो. (Muncipal Corporation) शहरातील पाणीपुरवठा अनेक वर्षांपासून विस्कळित आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा त्रास सहन करावा लागला.

शहराला पाणी पुरवठा करणारा नाथसागर काठोकाठ भरलेला असताना नागरिकांना मात्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते, यामुळे महापालिकेवरील रोष वाढत आहे. (Water Supply Issue) सध्या महापालिकेतर्फे काही भागात चार तर काही भागात पाच दिवसाआड पाणी दिले जाते. पाणी टंचाईसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेला तीन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची काय तयारी आहे, याची माहिती घेतली असता अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान राखत महापालिकेने नियोजन सुरु केले आहे.

सध्या शहरात पाणी साठवण्याची आवश्‍यक तेवढी सोय नाही. त्यामुळे तीन दिवसाआड पाणी देण्यासाठी अडचणी आहेत. असे असले तरी तीन दिवसांआड पाणी पुरवठा कसा करता येईल यासाठी नियोजन केले जात आहे. नागरिकांना रात्री-अपरात्री पाणी दिले जाऊ नये, याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. आगामी किमान दीड ते दोन महिन्यात तीन दिवसाआड पाणी दिले जाऊ शकते.

Water Supply Issue News, Aurangabad
Hingoli : अशोक चव्हाण राज्यातील काॅंग्रेसचे एक नंबरचे नेते, ते पक्ष सोडूच शकत नाही...

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काही कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पूर्वी ७२ कामांचा समावेश होता. आता त्यात वाढ करण्यात आली असून, ८० ठिकाणी कामे केली जात आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही कामे केली जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in