Aurangabad : राज ठाकरेंनी नाकारले, भाजपने स्वीकारले..

भाजप हाच असा एक पक्ष आहे, ज्याने हिंदुत्वाची भूमिका कधी सोडली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे विरोधकांना पुरून उरणारे असे आहे. (Aurangabad Bjp)
Devendra Fadanvis-Karad-Dashrathe-Save
Devendra Fadanvis-Karad-Dashrathe-SaveSarkarnama

औरंगाबाद : मी ३५ वर्ष शिवसेनेत आणि ३ वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम केले. हिंदह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका आणि भगवा खांद्यावर घेऊन मी काम केले. (Bjp) पण सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस सोबत जाऊन सत्ता मिळवली. हिंदुत्व सोडले, त्यानंतर मी हिंदूजननायक राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेत (MNS) काम केले. पण मला अचानक पदावरून काढून टाकले.

चार महिने माझी चूक काय हे तरी सांगा, असे मी त्यांना विचारत होतो. पण तेही सांगितले गेले नाही. त्यामुळे ज्या भाजपने हिंदुत्वाची कास कधीच सोडली नाही, भगवा कायम खांद्यावर ठेवला त्या पक्षात हिंदुत्वासाठी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वावर विश्वास म्हणून मी भाजपमध्ये आज प्रवेश केला असल्याचे सुहास दाशरथे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले. (Aurangabad)

शिवसेना, मनसे आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले सुहास दाशरथे हे गेली तीन वर्ष मनसेचे शहर-जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते. परंतु अचानक डिसेंबरमध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. मार्चपर्यंत राज ठाकरे आणि अन्य नेत्यांची संपर्क, मेसेजद्वारे संपर्क साधून देखील आपल्या का हटवले हे त्यांनी सांगितले नाही, असा आरोप करत दाशरथे यांनी मार्चमध्ये मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता.

तेव्हाच दाशरथे हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दाशरथे यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दाशरथे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला?

Devendra Fadanvis-Karad-Dashrathe-Save
Ajit Pawar : कोरोनामध्ये धंदे बसले, नोकऱ्या गेल्या आणि यांना भोंगा आठवतोय...

या संदर्भात बोलतांना ते म्हणाले, हिंदुत्व आणि भगव्याशिवाय मी राहूच शकत नाही. शिवसेनेत आणि त्यानंतर मनसेत मी हिंदुत्वासाठीच प्रवेश केला होता. मनसेत असतांना शहर आणि जिल्ह्यात पक्षाची बांधणी करत असतांनाच अचानक मला पदावरून हटवले गेले. राज ठाकरे यांच्या या निर्णाने माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. कारण मला काही न सांगता हा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानंतरही मी पक्षात मनसैनिक म्हणून काम करण्यात तयार आहे, पण माझी काय चुक झाली हे सांगा? अशी विचारणा मी वारंवार राजसाहेब आणि अन्य नेत्यांकडे करत होतो. पण मला काहीच सांगितले गेले नाही. चार महिने वाट पाहिल्यानंतर मी मार्चमध्ये मनसे सोडली. शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली देत ज्या राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या विरोध माझ्यासारखे हजारो, लाखो शिवसैनिक त्या काळात लढले होते, त्याच पक्षासोबत आज ते सत्तेसाठी जाऊन बसले.

अशावेळी भाजप हाच असा एक पक्ष आहे, ज्याने हिंदुत्वाची भूमिका कधी सोडली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हे विरोधकांना पुरून उरणारे असे आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास म्हणूनच मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कुठल्याही पदाची आशा न बाळगता मी मला सांगितले जाईल ते काम करेल आणि पक्षासाठी बेरजेचे ठरेल असेच काम प्रत्येक निवडणुकीत करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही दाशरथे यांनी सांगितले.

Devendra Fadanvis-Karad-Dashrathe-Save
Ajit Pawar : विक्रम काळे मंत्री करा म्हणतो अन् इतक्या मागण्या करतो, की मी दबकतच आलो..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com