Aurangabad : बागडेंना गावातच धोबीपछाड, सोसायटी निवडणुकीत फक्त १ जागा

विशेष म्हणजे गेली ३० वर्ष या सोसायटीवर बागडे नानांची मजबुत पकड होती. त्यामुळे असे कसे झाले? याची चर्चा गावात सुरू झाली आहे. (Mla Haribhau Bagde)
Bjp Mla Haribhau Bagde News, Aurangabad
Bjp Mla Haribhau Bagde News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : भाजपचे जिल्ह्यातील जेष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) (नाना) यांना त्यांच्याच गावातील विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. गेल्या तीस वर्षापासून असलेली सत्ता बागडे यांच्या हातून गेली आहे. (Bjp) विविध कार्यकारी सोसायटीच्या काल झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने १३ पैकी तब्बल १२ जागा जिंकल्या. तर बागडे यांच्या पॅनलमधील फक्त एक उमेदवार विजयी झाला आहे.

बागडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला गावातच विरोधकांनी धुळ चारल्यामुळे हा मोठा धक्का समजला जात आहे. (Aurangabad) औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीची निवडणुक पार पडली. या निवडणुकीत बागडेंच्या पॅनल विरोधातील महाविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले. बागडेंच्या पॅनला मात्र फक्त एकच जागा जिंकता आली.

विशेष म्हणजे गेली ३० वर्ष या सोसायटीवर बागडे नानांची मजबुत पकड होती. त्यामुळे असे कसे झाले? याची चर्चा गावात सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते व माजी आमदार रामभाऊ अप्पा गावंडे यांचे पुत्र शामराव गावंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी गावंडे यांच्या शिवशक्ती शेतकीर पॅनललचे १३ पैकी १२ उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. तर हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलमधील फक्त एका उमेदवाराला विजय मिळवता आला.

Bjp Mla Haribhau Bagde News, Aurangabad
मंत्रीमंडळ विस्तार ; टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने सत्तारांचा `बिसमिल्ला` होणार ?

बागडे हे जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काळापासून चितेपिंपळगावातील सगळ्या सहकारी संस्थावर बागडे नाना यांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. आमदार, विधानसभा अध्यक्ष आणि आता पुन्हा आमदार असा मोठा राजकीय अनुभव गाठीशी असतांना बागडेंवर गावातच अशी नामुष्की ओढावल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com