Aurangabad : मराठा उद्योजक घडवण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ कटीबद्ध..

लाभार्थ्यांनी कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याचे `सिबील` अहवाल निर्दोष कसा राहील याची काळजी घ्यावी. (Aurangabad)
Narendra Patil News, Aurangabad
Narendra Patil News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शेतकरी कुंटुबातील मराठा तरुणांना नवनवीन उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडळ नेहमीच प्रयत्न करीत आहे. मराठा समाजामधून देखील तरुण उद्योजक घडावेत यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कटीबद्ध आहे. मराठा समाजाची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जात असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज दिली.

Narendra Patil News, Aurangabad
Shivsena : उद्धव ठाकरे प्रामाणिक, तुम्हीच धोका दिला म्हणून उपमुख्यमंत्री व्हावे लागले..

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कामकाजाचा आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. (Maratha) राष्ट्रीयकृत बँकानी प्रलंबित प्रकरणे मंजुर करण्यामध्ये आवश्यक ती कार्यवाही करावी.

तसेच लाभार्थ्यांनी कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याचे `सिबील` अहवाल निर्दोष कसा राहील याची काळजी घ्यावी. महामंडाळाचे कर्ज प्रस्ताव ग्रामीण भागातील तरुणांचे अधिक असल्याने या योजनेच्या माहितीचे बँनर लावावे व जास्तीत जास्त तरुणांना उद्योजक होण्यासाठी मदत करण्याचे नरेंद्र पाटील यांनी आवाहन केले.

बँकातील कर्ज प्रस्ताव मंजूरीतील दलाल अथवा मध्यस्थी निर्मूलन करुन खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी पार पाडावी. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांची वयोमर्यादा १८ ते ६० अशी वाढवण्यात आली असून १५ लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा वाढवण्यात आली असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

महिलांसाठी कर्जसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर बँक कर्मचारी, लाभार्थी आणि महामंडळ यांचा संयुक्त मेळावा आयोजन करण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सुचनाही त्यांनी बँक प्रतिनिधीना केल्या. जिल्ह्यात दिलेला पाच हजार लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्व बँकानी महामंडळाच्या कर्जव्याज परताव्याची माहिती ग्रामीण भागात बँकेच्या शाखेमार्फत देण्यात यावी अशी सूचना पाटील यांनी बैठकीत उपस्थित बँक प्रतिनिधीना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com