Aurangabad : मंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तारांनी दर्ग्यावर चढवली चादर..

गयबनशहा वली दर्गा येथे सभामंडप, दर्गा परिसरात डोम, विद्युत रोषणाई, भक्तनिवास, पिण्याचे पाणी, स्वच्छता व प्रसाधन गृह आदी कामे लवकरच सुरू करण्यात येणार. (Minister Abdul Sattar)
Minister Abdul Sattar News, Aurangabad
Minister Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे पोळ्यानिमित्त आपल्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात आले आहेत. काल पोळ्या निमित्त त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बैलजोडीचे पूजन करून त्यांना पुरणपोळी खाऊ घातली. (Marathwada)

त्यानंतर पोळा पाडव्याच्या शुभेच्छा देत त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. (Aurangabad) आज मतदारसंघातील सारोळा येथील हिंदू - मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या गयबनशहा वली दर्ग्यावर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी चादर चढवली.

पोळा पाडव्यानिमित्त सारोळा येथे भव्य यात्रा महोत्सव साजरा केला जातो. या यात्रेनिमित्त सत्तार यांनी सारोळा येथे भेट दिली. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्तार यांनी भविकभक्तांना यात्रा महोत्सवाच्या शुभेच्छा देतांनाच गयबनशाह वली दर्गा येथे पायाभूत व मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध प्रस्तावांना मान्यता मिळालेली असल्याचे सांगितले.

Minister Abdul Sattar News, Aurangabad
बंब यांच्याशी मोबाईलवर वाद घालणाऱ्या शिक्षकाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

गयबनशहा वली दर्गा येथे सभामंडप, दर्गा परिसरात डोम, विद्युत रोषणाई, भक्तनिवास, पिण्याचे पाणी, स्वच्छता व प्रसाधन गृह आदी कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

याशिवाय तालुक्यातील विविध देवस्थानचा करण्यात आलेल्या विकास कामांचा उल्लेख करून गयबनशहा दर्गा येथे विकास कामे सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागाचे अधिकारी व गावकऱ्यांची सारोळा येथे बैठक घेणार असल्याचे देखील सांगितले. मंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार हे पहिल्यांदाच दर्ग्याच्या दर्शनासाठी आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com