Aurangabad : जल आक्रोशानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यात ११ दशलक्ष लिटरची वाढ..

सध्या औरंगाबाद शहरासाठी हर्सूल, जायकवाडी, फारोळा तसेच एमआयडीसीने वाढवून दिलेल्या ३ एमएलडी पाण्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Aurangabad)
Guardian Minister Subhash Desai
Guardian Minister Subhash DesaiSarkarnama

औरंगाबाद : शहराच्या पाणी पुरवठ्यात ११ दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. महानगरपालिका, जीवन प्राधिकरण तसेच एमआयडीसीने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना तीन ते चार दिवसाआड पाणी मिळेल असे नियोजन केले जात आहे. (Aurangabad) शहरवासियांना दिलासा मिळावा यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय व जल प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहारतील पाणी प्रश्नावरून भाजपने जोरदार आंदोलन सुरू केले होते. (Municipal Corporation) निवडणुकीत पाणी प्रश्न पेटला तर तो महागात पडेल याची जाणीव झाल्याने सत्ताधारी शिवसेना व राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. सर्वात प्रथम पाणीपट्टीमध्ये ५० टक्के कपात करण्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली.

ही घोषणा करत असतांनाच त्यांनी शहरातील पाणी पुरवठ्यात लवकरच वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे रोजी शहरात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या जल आक्रोशाचा परिणाम असा झाला की शहराच्या पाणी पुरवठ्यात ११ दशलक्ष लिटरची वाढ झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला.

Guardian Minister Subhash Desai
Latur : निलंगेकर-पवारांचे खरचं सूर जुळले, की मग फडणवीस येणार म्हणून दिखावा..

त्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली. सध्या औरंगाबाद शहरासाठी हर्सूल, जायकवाडी, फारोळा तसेच एमआयडीसीने वाढवून दिलेल्या ३ एमएलडी पाण्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय हाती घेतलेल्या विविध ४२ प्रकाराच्या कामांमुळे पाणी पुरवठ्याच्या सध्याच्या कालावधीत आणखी सुधारणा होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

औरंगाबादमधील नागरिकांना ३ ते ४ दिवसांनी पाणी मिळण्याचे नियोजन केले जात असून प्रयत्नांची पराकाष्टा केली जाईल, असे आश्वासन देखील देसाई यांनी दिले. दरम्यान, शहराला ११ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com