भाजपकडून जिवे मारण्याच्या धमक्या : शिवसेना तालुकाप्रमुखाचा व्हिडीओ व्हायरल

(BJP MLA Santosh Danve, however, has denied all the allegations.) नवनाथ दौड यांचे सर्व आरोप भाजप आमदार संतोष दानवे यांनी मात्र फेटाळून लावले आहेत.
भाजपकडून जिवे मारण्याच्या धमक्या : शिवसेना तालुकाप्रमुखाचा व्हिडीओ व्हायरल
Shivsena Taluka Chief- Mla Santosh DanveSarkarnama

जालना ः विकासकामांत अडथळा आणत भोकरदन तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला, पोलिसांसमक्ष मला व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे भोकरदन येथील तालुकाप्रमुख नवनाथ दौड यांनी केला आहे. आपल्या कुटुंबासह दौड यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली.

दौड हे जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आहेत. भाजप कार्यकर्त्यांवर जीवे मारण्याची धमकी आणि हल्ला केल्याचा आरोप होताच आमदार संतोष दानवे यांनी देखील सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत दौड यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाच वर्षात काहीच कामे केली नाही, आता पुन्हा जनतेसमोर ते जात असतांना लोक त्यांना जाब विचारत असल्यामुळेच दौड यांनी हे खोटे आरोप केले आहेत. पण जनता त्यांना माफ करणार नाही, असे सांगत संतोष दानवे यांनी दौड यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

भोकरदन तालुक्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद अधूनमधून होत असतो. वर्षभरापुर्वी एका रस्त्याच्या कामावरून शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर आणि सध्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात देखील श्रेयवादावरून शीतयुद्ध चांगलेच रंगले होते. आता पुन्हा एकदा शिवसेनेच्याच तालुकाप्रमुखाने भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांवर धमकावण्याचा आरोप केला आहे.

भाजप कार्यकर्ते विकासकामात अडथळा आणून जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप करत नवनाथ दौड यांनी पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. शिवाय आपल्यावर कधीही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला होऊ शकतो, तेव्हा पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी देखील दौड यांनी केली आहे.

Shivsena Taluka Chief- Mla Santosh Danve
तर मग महाराष्ट्र केंद्रशाशित करा आणि केंद्र सरकारला चालवायला द्या

नवनाथ दौड हे जालना जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य आहेत. जिल्हा परिषद गटात विकासकामे करताना भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुन भाजप कार्यकर्ते त्रास देऊन अडथळा आणत असल्याचा आरोप दौड यांनी केला आहे. अन्वा येथील स्मशानभूमीसह सिंगल फेज योजनेच्या कामात भाजप कार्यकर्त्यांकडून अडथळा आणला जात असून विकासकामे करण्यास मज्जाव केला जात आहे.

जर काम केले तर कुटुंबासह तुला मारून टाकू, अशा धमक्या भाजप कार्यकर्त्यांकडून आपल्याला दिल्या जात आहेत. शिवसेनेने लावलेले पोस्टर फाडण्यात आले असून पोलिसांसमोरच मला मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यामुळे आपल्याला पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी देखील नवनाथ दौड यांनी केली आहे. नवनाथ दौड यांचे सर्व आरोप भाजप आमदार संतोष दानवे यांनी मात्र फेटाळून लावले आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in