राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला ; दोन गोळ्या झाडल्या

एक गोळी ही गाडीच्या पुढील काचावर लागली आहे, तर एक गोळी ड्राइवर साईडच्या बाजूला लागली.
Nitin Bikkad
Nitin Bikkadsarkarnama

उस्मानाबाद : राष्ट्रवादी युवक कॉग्रेस (ncp) अध्यक्षाच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात नुकतीच घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. गोळीबाराचे कारण अद्याप कळू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड (Nitin Bikkad) यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे.

बिक्कड यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यातील एक गोळी ही गाडीच्या पुढील काचावर लागली आहे, तर एक गोळी ड्राइवर साईडच्या बाजूला लागली. या जीवघेण्या हल्ल्यात बिक्कड हे बचावले आहेत.

Nitin Bikkad
Presidential Election : भाजपकडून 'या' दोन नेत्यांच्या नावांची चर्चा..

पारा -फक्राबाद रोडवर बिक्कड त्यांच्या गावी जात असताना हा गोळीबार झाला या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.

पुण्यातील मनसेचे नेते, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More)यांच्या मुलाला तीन दिवसापूर्वी धमकीचं पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मशिदीवरील भोंगे खाली उतरविण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध करणारे वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्या मुलगा रुपेश याला धमकी मिळाल्याने चर्चा रंगली आहे.

Nitin Bikkad
मुंबईची तुंबई होऊ नये, म्हणून ठाकरेंचा हा फॉम्युला यशस्वी ठरणार का ?

"सावध राहा रुपेश" अशा आशयाची चिठ्ठी वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हे ठेवली होती. ही घटना ती दिवसापूर्वी घडली आहे. याबाबत वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com