Assembly Session : शिरसाट, शेलारांच्या मंत्रीपदासाठी मुंडेची घोषणाबाजी..

`संजय शिरसाट यांना मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आशिष शेलारांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सुधीर मुनगंटीवार यांना महत्वाचे खाते न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो`.
Mla Dhnanjay Munde-Sanjay Shirsat-Shelar News Mumbai
Mla Dhnanjay Munde-Sanjay Shirsat-Shelar News MumbaiSarkarnama

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधारी आमदार, मंत्र्यांच्या विरोधात विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये माजीमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) चांगलेच आघाडीवर होते. दोन मंत्र्यांचे सरकार अशी टीका झाल्यानंतर तब्बल ४१ दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार झाला, त्यानंतर खातेवाटपालाही उशीर, अनेकांना कमी महत्वाचे खाते तर काहींना डावलले.

त्यामुळे नव्या सरकारमधील अनेक मंत्री, आमदार नाराज आहेत, ती समोरही आली आहे. यावरून धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरत विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या घोषणा ऐकून तिथे उपस्थित विरोधी पक्षनेते अजित पवार, व इतरांनाही हसू आले. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट, (Sanjay Shirsat) भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मंत्रीपद न मिळाल्याचे सांगत त्यांना मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा धनंजय मुंडे यांनी देताच त्यांना विरोधी आमदारांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.

संजय शिरसाट व शेलारांच्या मंत्रीपदासाठी धनंजय मुंडेंनी केलेली घोषणाबाजी चांगलीच चर्चेत आली. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिंदे सेनेच्या संजय शिरसाट व भाजपच्या आशिष शेलार यांचा मंत्रीमंडळात समावेश होईल असे वाटत असतांना त्यांना डावलण्यात आले. तर युती सरकारमध्ये वजनदार खाते असलेल्या सुधीर मुनगंटीवार व अन्य मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये दुय्यम खाती देण्यात आली.

यामुळे सरकारमध्ये असलेली नाराजी व त्यावरून सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीने आज करण्यात आला. धनंजय मुंडे यासाठी आघाडीवर होते. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सत्ताधारी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एन्ट्री होताच घोषणाबाजी सुरू झाली. शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांना तर गद्दार म्हणूनच हिणवण्यात आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सरकारमध्ये डावलण्यात आलेल्या आणि दुय्यम खाती दिलेल्या आमदार, मंत्र्यांकडे आपला मोर्चा वळवला.

Mla Dhnanjay Munde-Sanjay Shirsat-Shelar News Mumbai
Ajit Pawar: हल्ली अनेक राज्यपाल वादात सापडतात; कौतुक राष्ट्रपतींचे, टोला कोश्‍यारींना...

`संजय शिरसाट यांना मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आशिष शेलारांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सुधीर मुनगंटीवार यांना महत्वाचे खाते न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो`, अशा घोषणा धनंजय मुंडे व आघाडीच्या आमदारांनी द्यायला सुरूवात केली. तेव्हा तिथे उपस्थितीत अजित पवार यांना देखील हसू आवरले नाही. त्यानंतर ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना मदत न करणारे सरकार हाय हाय, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

त्यामुळे मंत्रीमंडळात समावेश न होऊ शकलेल्या व दुय्यम दर्जाच्या खात्याचा पदभार मिळालेल्या आमदार व मंत्र्यांना हायसे वाटले असेल. उघडपणे नाराजी व्यक्त न करू शकणाऱ्या या मंडळींचे दुःख धनंजय मुंडे यांनी या निमित्ताने समोर आणले, अशी चर्चा विधीमंडळ परिसरात सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com