Assembly Session : बसून बोलू नका, बाहेर लाॅबीत जा, सोळंकेंनी भाजपच्या शेलारांना झापले..

राष्ट्रीयकृत बॅंकाकडून जिल्ह्यामंध्ये शेतकऱ्यांना जे कर्जवाटप केले जाते, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा मुद्दा सोळंके यांनी सभागृहात उपस्थित केला. (Mla Prakash Solanke)
Ashish Shealr-Prakash Solanke
Ashish Shealr-Prakash SolankeSarkarnama

औरंगाबाद : माजलगांव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल त्यांनी बीड (Ncp) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत धडाकेबाज भाषण करत परिस्थिती मांडली. विशेष म्हणजे ते सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील ते हातचे राखून बोलले नाही. (Mla Prakash Solanke) परिणामी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांनी केलेल्या आरोपांची आणि मुद्यांची तातडीने दखल घ्यावी लागली आणि बीडच्या पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घ्यावा लागला. (Marathwada)

हे सगंळ सांगण्याचे कारण म्हणजे आज दुसऱ्या दिवशी त्यांच्या आक्रमक स्वभावाचा फटका आणि अनुभव भाजपचे आमदार आशिष शेलार यांना आला. त्याचे झाले असे की, राष्ट्रीयकृत बॅंकाकडून जिल्ह्यामंध्ये शेतकऱ्यांना जे कर्जवाटप केले जाते, त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा मुद्दा सोळंके यांनी सभागृहात उपस्थित केला. पैसे देऊन दलालामार्फत फाईल करणाऱ्यांचे काम दहा मिनिटात होते, मात्र सर्वसामान्यांच्या कर्जाच्या फायली मात्र मंजुर होत नाही, असा आरोप सोळंके यांनी केला.

यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जागेवर बसूनच अडथळा आणला, त्यामुळे सोळंके चांगले संतापले. `अहो शेलार साहेब मी राष्ट्रीयकृत बॅंकेच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो आहे, तुम्ही वेगळंच म्हणतायं, शिवाय खाली बसून बोलू नका. मी बोलत असतांना अडथळा निर्माण करू नका. बोलायचेच असेल तर बाहेर लाॅबी आहे, तिथे जाऊन गप्पा मारा, अशा शब्दात सुनावले.

सोळंके यांचा हा आक्रमक पावित्रा पाहिल्यानंतर शेलार गप्प बसले आणि मग सोळंकेने पुढे भाषण सुरू केले. प्रकाश सोळंके हे विधानसभेतील वरिष्ठ सदस्य आहेत. ते सातत्याने आपल्या मतदारसंघातून निवडून येतात. बीड जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा पक्षात दरारा आहे.

Ashish Shealr-Prakash Solanke
Aurangabad : डॅशिंग केंद्रेकरांनी विषारी घोणसला थोपवून ठेवत साहसाचे दर्शन घडवले..

आजही जिल्ह्यात त्यांच्या शब्द प्रमाण मानला जातो. त्यामुळे आज भाषणात अडथळा निर्माण करणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यांनी कडक शब्दात सुनावले, त्यांच्या या झापाझापीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com