Ashok Chavan In Karnataka campaigning News : सहा मतदारसंघात सभा, तीन ठिकाणी विजय ; अशोक चव्हाणांना `फिप्टी-फिप्टी` यश...

Nanded : चिकोडी सदलगा, बेळगाव ग्रामिण, भालकी या तीन मतदारसंघात कॉंग्रेसचा विजय झाला आहे.
Ashok Chavan News, Nanded
Ashok Chavan News, NandedSarkarnama

Congress : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election) महाराष्ट्रातून ज्या दोन नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली होती, त्यात अशोक चव्हाण यांचे नाव होते. चव्हाण हे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. शिवाय दिल्लीत त्यांचा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह वरिष्ठांशी चांगला संपर्क आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर सहा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Ashok Chavan News, Nanded
Mla Dhiraj Deshmukh On Karnataka Victory : कर्नाटकाच्या जनतेला दिलेली विकासाची गॅरंटी काॅंग्रेस पुर्ण करेल...

चव्हाण यांनी तिथे सभाही घेतल्या होत्या. पैकी तीन मतदारसंघात काॅंग्रेसचा तर तीन ठिकाणी भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे (Ashok Chavan)अशोक चव्हाणांसाठी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत `फिप्टी फिप्टी`, यश मिळाले असेच म्हणावे लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली आहे. (Nanded) या यशात देशभरातून कर्नाटकात प्रचारासाठी गेलेल्या नेत्यांचा देखील महत्वाचा वाटा आहे.

महाराष्ट्रातून स्टार प्रचारक म्हणून अशोक चव्हाण यांना कर्नाटक मोहिमेवर पाठवण्यात आले होते. त्यांच्यावर सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. (Marathwada) चव्हाण यांनी चिकोडी सदलगा, निपाणी, बेळगाव ग्रामिण, खानापूर, भालकी आणि औराद या सहा विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा, रॅली, कॉर्ऩर बैठका घेतल्या होत्या. त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमर राजूरकर होते. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, नगरसेवकही प्रचारासाठी सहभागी झाले होते.

या सहापैकी चिकोडी सदलगा, बेळगाव ग्रामिण, भालकी या तीन मतदारसंघात कॉंग्रेसचा विजय झाला आहे. तर उर्वरित निपाणी, खानापूर आणि औराद या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. आठवडाभर ठाण मांडून चव्हाण यांनी या मतदारसंघात प्रचार सभा, रॅलीच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून अशोक चव्हाण यांना मिळालेले यश हे फिप्टी फिप्टी आहे. परंतु कर्नाटक राज्यात काॅंग्रेसची बहुमतासह सत्ता आल्यामुळे चव्हाण यांच्यावर सोपवलेल्या सहा पैकी तीन मतदारसंघातील विजय देखील महत्वाचा ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com