प्रत्येक कामाचा एक टक्का घेतो; कार्यकारी अभियंंत्याचा तो व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यातील जिल्हा परिषद (Zilla Parishad) बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याचा टक्केवारी मागतानाचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे.
beed Zilla parishad
beed Zilla parishad

बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद (Zilla Parishad) बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याचा टक्केवारी मागतानाचा एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत"प्रत्येक कामाचा एक टक्का घेतो" ड्रायव्हरकडे पैसे द्या. असे संभाषण आहे. या व्हिडीओमुळे सध्या बीडमध्ये (Beed) चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रारदाराने कार्यकारी अभियंत्याचा टक्केवारी मागतानाचा व्हिडिओ व लेखी तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांना देत कारवाईची मागणी केली आहे. (Beed Corruption News Updates)

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्हा परिषदेत बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता पी.जी. हाळीकर (P.G.Halikar) यांचा हा व्हिडीओ असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यासंदर्भात हाळीकर यांना विचारले असता, त्यांनी आरोप फेटाळून लावत हा व्हिडीओ बनावट असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमधील आवाज माझा नाही, कोणातरी खोडसाळपणा केला आहे. या संदर्भात मी वरिष्ठांना कळवलं आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण पुढील तक्रार करणार असल्याचे स्पष्टीकरण हाळीकर यांनी दिले आहे.

beed Zilla parishad
धक्कादायक : दौंडमध्ये तब्बल आठ हजार जणांची नावे मतदारयादीतून वगळण्याचा घाट

तक्रारदार, अशोक काळकूटे (Ashok Kalkute) यांनी कार्यकारी अभियंता पी. जी. हाळीकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार (Ajit-pawar) यांच्या विरोधात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तक्रार करताना संबंधित लाचखोरीचा व्हिडिओचा पुरावा देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच,काळकूटे यांनी तक्रार करताना आपल्या अर्जात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार देऊनही, या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावरही कारवाई केली जावी. अशी मागणी तक्रारदार अशोक काळकुटे यांनी केली आहे.

प्रशासनाने या भ्रष्ट आणि लाचखोर अधिकाऱ्यांची त्यांच्या कुटूंबियांलह नातेवाईकांच्या संपत्तीचीही चौकशी करावी, हाळीकर यांची संपूर्ण संपत्ती आणि बँक खातेही सील करुन त्यांच्या संपत्तीची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यानी आपल्या अर्जातून केली आहे. या प्रकरणी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही निवेदन देण्यात आले आहे. (Beed Latest News Updates)

अशोक काळकुटे यांनी 23 डिसेंबर 2021 रोजीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पी.जी हाळीकर यांची तक्रार करत चौकशीची मागणी केली होती. मात्र त्यांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळेच यावेळी तक्रारदार काळकूटे यांनी थेट व्हिडिओ पुरावा देत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांमध्ये काय सुरू आहे, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in