Ashok Chavhan : चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात? श्रीजया यांच्या फ्लेक्सची एकच चर्चा!

Ashok Chavhan : भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजयाचा फोटो झळकत आहे.
Shreejaya
ShreejayaSarkarnama

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कुटूंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. काँग्रेसच्या भारत जोडो अभियानात श्रीजया अशोक चव्हाण या सहभागी होणार आहेत. पहिल्यांदाच भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजयाचा फोटो झळकत आहे. यामुळे श्रीजया आता राजकारणात सक्रियपणे सहभाग होतील, अशा चर्चांना उधाण येत आहे.

Shreejaya
Osmanabad : आमदार पाटलांच्या उपोषणाचे दुसरे यश, अतिवृष्टीच्या नुकसानीचे ६० कोटी मंजूर..

आगामी विधानसभा निवडणुक ही सुजया चव्हाण लढविणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, यांच्या नंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी राजकीय वारसा चालवला. अशोक चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया दोन मुली आहेत. पत्नी अमिता चव्हाण काही काळ राजकारणात सक्रिय होते, त्या मागील कालखंडात आमदार ही राहील्या आहेत. मात्र, चव्हाणांची तिसरी पिढी श्रीजयाच्या रुपाने राजकारणात आली आहे.

Shreejaya
Bharat Jodo यात्रेत शरद पवार सहभागी होणार; कॉंग्रेस नेत्याने स्पष्टच सांगितलं

श्रीजया यांचं शिक्षण एलएलबी, एलएलएम झालं आहे. यापुर्वी अशोक चव्हाण यांना राजकीय वारसा बाबत अनेक वेळा विचारणा केली होती मात्र, त्यांनी यावर बोलणे टाळले होते. आता मात्र भारत जोडो यात्रे निमित्त श्रीजया यांच्या राजकीय पर्वाला सुरूवात झाली आहे. जिल्हाभर लावलेल्या बॅनर वरुन हेच अधोरेखित होत आहे. यामुळे आता चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in