
Aurangabad Political News : केंद्र सरकारच्या विरोधात काॅंग्रेसने देशभरात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. देशभरातील विविध राज्यातील प्रमुख नेत्यांवर यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Congress Yatra News) मराठवाड्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आहे. या जनसंवाद यात्रेच्या तयारीसाठी बैठका सुरू असून येत्या ३ ते १३ सप्टेंबर दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही जनसंवाद यात्रा निघणार आहे.
प्रत्येक तालुक्यातून जाणाऱ्या या यात्रेला अशोक चव्हाण (Ashok Chavan) झेंडा दाखवणार आहेत. जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचे तसे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे हे चव्हाण यांच्या संपर्कात आहेत. (Congress) केंद्र शासनाकडून होणारा तपास यंत्रणांचा गैरवापर, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी या विषयांची पोलखोल करण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे ही जनसंवाद यात्रा काढली जाणार आहे.
अशोक चव्हाण यांच्यासह माजी मंत्री, विविध पदाधिकारी यात्रेत सहभागी होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे बेरोजगारी वाढली असून, डीएमआयसीमध्ये दहा हजार हेक्टर जमीन पडून असताना कारखाने येण्यास तयार नाहीत. (Marathwada) दुष्कळी परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नाही, यासह इतर विषयांवर जनतेचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर जनसंवाद यात्रा काढली जाणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शहर व जिल्ह्यात देखील यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेत २० पदाधिकारी बसमध्ये बसून, प्रत्येक तालुक्यात, बाजाराच्या ठिकाणी जाणार आहेत. या शिवाय तीन व चार रोजी शहरातील मध्य मतदारसंघ, सहा व सात पूर्व व नऊ, १० सप्टेंबरला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पायी यात्रा निघणार असल्याचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी सांगितले.
या दरम्यान, तीन सभाही होणार आहेत. इम्रान प्रतापगढी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, असिफ खान, अशोक चव्हाण, चंद्रकांत हंडोरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काॅंग्रेस जिल्ह्यात मोठे शक्तीप्रदर्श करण्याच्या तयारीत आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.