Ashok Chavan : शिंदे-फडणवीस सरकार बोम्मईंची पाठराखण का करत आहे ?

Winter Session : बोम्मई यांनी केलेला महाराष्ट्राचा अवमान व त्याबाबत राज्य सरकारची निष्क्रियता, याकडे विधानसभेचे लक्ष वेधले.
Ashok Chavan, News, Aurangabad
Ashok Chavan, News, Aurangabadsarkarnama

Winter Session : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि त्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. Congress महाराष्ट्राचा सातत्याने अवमान करणाऱ्या बोम्मई यांना राज्य सरकार पाठीशी का घालत आहे? असा सवाल काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सभागृहात केला.

Ashok Chavan, News, Aurangabad
Raosaheb Danve : सगळे राजकीय पक्ष मिळून आम्हाला रोखू शकले नाहीत ..

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावाद आणि बोम्मई यांच्या चिथावणीखोर विधानांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचे जाहीर केले. हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. (Karnataka) कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आणि त्यावरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून केली जाणारी चिथावणीखोर भाषा याकडे (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधत सरकारला ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले.

अशोक चव्हाण म्हणाले, सीमाप्रश्नासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महाराष्ट्राचा अवमान करून चिथावणी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहण्याची घोषणा आज विधानसभेत केली. बोम्मई यांनी केलेला महाराष्ट्राचा अवमान व त्याबाबत राज्य सरकारची निष्क्रियता, याकडे विधानसभेचे लक्ष वेधले.

ते बदनामीकारक ट्वीट बोम्मई यांच्या व्हेरिफाईड हॅंडलवरून झाले. त्या ट्वीटर हॅंडलला ब्ल्यु टिक आहे. अजूनही ते ट्वीट डिलिट झाले नाहीत, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या पश्चातही महाराष्ट्राचे सरकार त्यांनी पाठीशी का घालते ? ते हॅंडल फेक असल्याचे सांगून आपण त्यांची पाठराखण का करतो? कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर आरोप करीत असताना राज्य सरकार शांत का आहे ? असे अनेक प्रश्न मी विधानसभेत उपस्थित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com