Ashok Chavan : तांबे प्रकरणाची माहिती थोरातांना असेल, त्यांच्या घरातला विषय आहे..

Congress : तांबे किंवा त्यांचे वडील यापैकी एकाने कुणीतरी एबी फाॅर्म घेवून उमेदवारी अर्ज दाखल केला असता तरी चालले असते.
Ashok Chavan News, Aurangabad
Ashok Chavan News, AurangabadSarkarnama

Marathwada : नाशिक पदवीधर मतदारसंघात काॅंग्रेसच्या उमेदवारीवरून जो काही प्रकार घडला तो योग्य नव्हता. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जर तांबेंना कोरे एबी फाॅर्म दिले होते, तर किमान दोघांपैकी एकाने तरी अर्ज भरायला हवा होता. पण या विषयावर मी अधिक बोलू शकणार नाही. बाळासाहेब थोरातांना या संदर्भात अधिक माहिती असू शकेल, त्यांच्या घरातलाच हा विषय असल्याचे (Congress) काॅंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Ashok Chavan News, Aurangabad
Mla Kailas Patil News : सात दिवसात पंचनाम्याच्या प्रती द्या, नाहीतर विमा कंपनी कार्यालयाला टाळे ठोकतो..

औरंगाबादेत प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून झालेल्या गोंधळावर भाष्य केले. (Satyajit Tambe) सत्यजीत तांबे किंवा त्यांचे वडील यापैकी एकाने कुणीतरी एबी फाॅर्म घेवून उमेदवारी अर्ज दाखल केला असता तरी चालले असते. (Ashok Chavan) आमच्या प्रदेशाध्यक्षांनी तांबे यांना कोरे एबी फाॅर्म दिल्याचे जाहीर सांगितले आहे.

असे असतांना हा प्रकार कसा घडला? याबाबत आता प्रदेश आणि अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटी योग्य तो निर्णय घेईल. बाळासाहेब थोरात यांना या संदर्भात अधिक माहिती असू शकेल, कारण त्यांच्या घरातला विषय आहे, असेही चव्हाण म्हणाले.

या सगळ्या नाट्यानंतर आता शुभांगी पाटील या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागायला गेल्या असून शिवसेना त्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. यावर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष मिळून या संदर्भात निर्णय घेतील असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com