Ashok Chavan: बिल्डर बियाणींच्या हत्येची एसआयटी मार्फत चौकशी..

ज्या कुण्या व्यापारी, उद्योजक किंवा व्यक्तीला खंडणी किंवा इतर कारणांसाठी धमक्या येत असतील त्यांनी न घाबरता गुप्तपणे पोलिसांना किंवा मला याची माहिती द्यावी. (Ashok Chavan)
Let.Sanjay Biyani-Ashok Chavan
Let.Sanjay Biyani-Ashok ChavanSarkarnama

नांदेड : शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची जी निर्घण हत्या झाली आहे, ती चितेंचा विषय आहे. (Marathwada) ही हत्या कुणी केली, कशासाठी केली, यामागचे सूत्रधार कोण? याचा तपास लवकर लागावा यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. (Nanded) त्यामुळे या खूनचा स्वतंत्रपणे तपास करून बियाणी यांचे मारेकरी आणि त्यांच्या सुत्रधारांच्या मुसक्या लवकरच आवळण्यात येतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेडकरांना दिला.

पोलिस अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बियाणी यांची काल दिवसाढवळ्या मोटारसायकरवरून आलेल्या दोघांनी जवळून गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने शहर हादरून गेले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बियाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत याविषयावर आपली भूमिका मांडली.

चव्हाण म्हणाले, बियाणी एक दानशूर व्यक्ती होते, अगदी कमी काळात त्यांनी बांधकाम क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. अशा व्यक्तीची गोळ्या घालून हत्या होणे हे माझ्यासह नांदेडकरांसाठी देखील धक्कादायक आहे. अशा घटनांमुळे निश्चितच चिंता वाढली आहे. बियाणी यांचा खून का झाला? त्याचा सूत्रधार कोण आहे? यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही, पोलिस याचा तपास करत आहेत.

बियाणी यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना पडलेले प्रश्न किंवा तपास कुठल्या दिशेने करायचा याच निर्णय पोलिस घेतील. यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. हत्येचा तपास लवकर लागावा यासाठी एसआयटीला काही पोलिस अधिकारीसुद्धा देण्यात आले आहेत. नांदेडकरांना माझी एकच विनंती आहे, की ज्या कुण्या व्यापारी, उद्योजक किंवा व्यक्तीला खंडणी किंवा इतर कारणांसाठी धमक्या येत असतील त्यांनी न घाबरता गुप्तपणे पोलिसांना किंवा मला याची माहिती द्यावी, जेणेकरून अशा घटनांना पायबंद घालता येईल.

Let.Sanjay Biyani-Ashok Chavan
Aurangabad : मनसेकडून भाजपला स्थापना दिनाच्या शुभेच्छा..

उद्या मुंबईत मंत्रीमंडळाची बैठक देखील आहे. यामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि डीजींसोबत देखील मी या विषयावर चर्चा करणार आहे. या हत्ये मागे बाहेरील राज्यातील काही आरोपींचा संबंध आहे का? या दृष्टीने तपासाला अधिक वेग येण्यासाठी योग्य पावले उचलली जावीत, हा विषय मी गृहमंत्र्यांच्या भेटीत मांडणार आहे. डीजी आणि गृहमंत्र्यांची या विषयावर सविस्तर बैठक घेण्याचा देखील आपला प्रयत्न असणार आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com