अशोक चव्हाणांच्या विधानामुळे शिंदेंची कोंडी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेनेला (Shivsena) निधी मिळत नाही, असा आरोप करत शिंदे गटाने बंड केले.
Ashok Chavan, Eknath Shinde
Ashok Chavan, Eknath Shindesarkarnama

नांदेड : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये शिवसेनेची (ShivSena) कोंडी होत आहे. शिवसेनेला निधी मिळत नाही, असा आरोप करत शिंदे गटाने बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या वक्तव्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होण्याची शक्याता आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, भाजप, शिवसेना युती सरकारच्या काळात युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोटच अशोक चव्हाण केला आहे.

Ashok Chavan, Eknath Shinde
इतिहास तर चिन्ह गोठविण्याचाच ; शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे काय होणार ?

२०१९ च्या विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढवली होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, भाजपसोबत आता राहायचे नाही ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वीच म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. तेव्हा शिवसेनेचे मंत्री आमचा राजीनामा खिशात आहे, असे जाहीर भाषणांमध्येही सांगत होते. युतीसरकामध्ये आपल्याला सन्मान मिळत नाही, अशी तक्रारही शिवसेनेने केली होती.

आपण, म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करु, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे नेते आले होते. त्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असेही चव्हाण यांनी सांगितले आहे, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले आहे.

Ashok Chavan, Eknath Shinde
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट; आता माजी मुख्यमंत्र्याच्या नावाची चर्चा

अशा प्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करा, असे मी या नेत्यांना सांगितले होते, असेही चव्हाण यांनी सांगितले. मात्र, नंतर ते पवार साहेबांना भेटले किंवा नाही याबाबत मला काहीही माहिती नाही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या या खुलाशामुळे विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांना भाजप विषयी काय वाटते, हा प्रश्न उपस्थित होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com