Ashok Chavan On Mp Balu Dhanorkar : बाळु धानोरकरांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी..

Congress : जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते.
Ashok Chavan On Mp Balu Dhanorkar News
Ashok Chavan On Mp Balu Dhanorkar NewsSarkarnama

Marathwada News : काॅंग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील चंद्रपुरचे एकमेव खासदार बाळु धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाने काॅंग्रेससह सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. (Ashok Chavan On Mp Balu Dhanorkar) काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीच धानोरकर यांना काॅंग्रेसमध्ये आणले होते. तेव्हा प्रदेशाध्यक्ष असलेल्या चव्हाणांनी धानोरकरांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते.

Ashok Chavan On Mp Balu Dhanorkar News
Imtiaz Jalil On Mp Balu Dhanorkar : `बाळा`, तुझी खूप आठवण येईल, धानोरकरांच्या निधनाने इम्तियाज जलील भावूक..

परंतु धानोरकरांना उमेदवारी न मिळाल्याने नंतर अनेक घडामोडी घडल्या आणि काॅंग्रेसने जाहीर केलेला उमेदवार बदलला आणि धानोरकरांना उमेदवारी दिली होती. धानोरकरांच्या निधनाने चव्हाण यांना धक्का बसला आहे. बाळूभाऊ धानोरकरांचे (Balu Dhanorkar) निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्विटच्या माध्यमातून बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Congress) चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे.

राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे. बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते.

जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहर्‍यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहिल. बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com