Ashok Chavan News : विखे माझे मित्र, पण ते शत्रूसारखं का वागतायेत ?

Congress : विखे पाटील यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामागे काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हेतू आहे का?
Ashok Chavan News, Nanded
Ashok Chavan News, NandedSarkarnama

Nanded : शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नुकतीच काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची आॅफर दिली होती. यावर अशोक चव्हाण यांनी, विखे हे माझे मित्र आहेत की शत्रू असा प्रश्न पडत असल्याचे सांगत मला त्यांची आॅफर मान्य नसल्याचे म्हटले आहे.

Ashok Chavan News, Nanded
Bjp News : दानवेंच्या मुलीच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार विरोधातच मोर्चा..

अनेक पक्षांमध्ये माझे मित्र आहेत. विखे पाटील आणि मी तर अनेक वर्ष एकाच पक्षात काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी देखील माझी चांगली मैत्री आहे. (Congress) पण त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची आॅफर दिल्यानंतर ते खरंच माझे मित्र आहेत की शत्रू ? असा प्रश्न पडतो, असा टोला देखील चव्हाण (Ashok Chavan) यांनी लगावला.

काॅंग्रेसमध्ये काही राहिलेले नाही, तेव्हा अशोक चव्हाणांनी आता विचार करावा, देशाने मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे, तुम्ही देखील स्वीकारा, अशी साद विखेंनी नुकतीच अशोक चव्हाणांना घातली होती. त्यावर दोन दिवसांनी चव्हाणींनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, राज्याच्या राजकारणात माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत. मात्र आमची विचारधारा वेगळी आहे. विखे पाटील हे देखील माझे मित्र आहेत, पण त्यांची ऑफर मला मान्य नाही. विखे पाटील यांनी मला दिलेली ही ऑफर पाहता ते माझे मित्र आहेत की शत्रू? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामागे काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हेतू आहे का? अशी शंका आपल्याला येत असल्याचेही चव्हाण म्हणाले. राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे. वारंवार सुनावणी पुढे ढकलल्या जात असल्याने उशिराने दिलेला न्याय हा न्याय नाकारण्यासारखे होऊ नये, अशी शंका देखील चव्हाण यांनी यावेळी उपस्थितीत केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com