Ashok Chavan : टीका करणाऱ्या विखेंनी ते आधी काॅंग्रेसमध्येच होते हे लक्षात ठेवावे..

राज्यात सर्व विभागांना निधी देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. राज्य सरकार चांगल्या प्रकारे काम करीत आहे. (Ashok Chavan)
Ashok Chavan Sujay Vikhe News, Ashok Chavan on Sujay Vikhe Patil, Ashok Chavan News
Ashok Chavan Sujay Vikhe News, Ashok Chavan on Sujay Vikhe Patil, Ashok Chavan News Sarkarnama

तुळजापूर : राज्य कोव्हिडच्या आजारानंतर आता चांगल्या प्रकारे प्रगती करीत आहे, असा दावा राज्याचे साव॔जनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला. चव्हाण यांनी आज तुळजापूरात तुळजा भवानीचे सपत्नीक दर्शन घेतले. तुळजा भवानी मातेच्या दश॔नासाठी मी दरवर्षी येतो. (Sujay Vikhe) मागील दोन वर्षात कोरोना असल्याने येऊ शकलो नसल्याचेही ते म्हणाले. (Marathwada)

त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना चव्हाण यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुर्णपणे कमी झाला आहे, राज्य सरकारने देखील सगळे निर्बंध हटवले आहे. धार्मिक स्थळे देखील खुली झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी तुळजा भवानी मातेचे दर्शन घेत राज्यात सुख, समृद्धी नांदू दे असे साकडे घातले. (Ashok Chavan Sujay Vikhe News)

राजकारणाचा बिघडत चाललेला स्तर आणि भाजप खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करतांना काॅंग्रेसचा न बोलावलेले वऱ्हाडी असा केलेला उल्लेख यांचाही समाचार घेतला. चव्हाण म्हणाले, राज्यात कोरोनाच्या दोन वर्षानंतर आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना अनेक अडथळे पार करत जावे लागत आहे.

राज्यात सर्व विभागांना निधी देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. राज्य सरकार चांगल्या प्रकारे काम करीत आहे. राज्यातील राजकारणाचा स्तर बिघडला असल्याचे सांगत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या टिकेला उत्तर देतांना यापूर्वी विखे हे काॅग्रेसमध्येच होते याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

Ashok Chavan Sujay Vikhe News, Ashok Chavan on Sujay Vikhe Patil, Ashok Chavan News
Kailas Gorantyal : त्या दोघांना समजावून सांग, माझी नाराजी चांगली नाही ; आमदाराने धमकावले

सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करतांना राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको आणि काॅंग्रेस न बोलवता आलेले वऱ्हाडी, असा उल्लेख केला होता. यावर चव्हाण यांनी विखे यापुर्वी काॅंग्रेसमध्ये होते, अशा मोजक्या शब्दात त्यांना टोला लगावला. तुळजा भवानी मंदीर समितीच्या वतीने चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार अमर राजुरकर, सुनिल चव्हाण, काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड धीरज पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी तुळजा भवानी मातेचे अभिषेक परंपरेने सुरू करावेत, अशी मागणी पुजारी बांधवांच्या वतीने करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com