Ashok Chavan : पळवून नेलेला वेदांता-फॉक्सकॉन परत करा, मोठ्या प्रकल्पाचं चॉकलेट नको

हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यात अर्थ नाही. राज्याने केंद्राला सांगावं की भविष्यात जो मोठा प्रकल्प तुम्ही महाराष्ट्राला देऊ करता आहात, तो आमच्या एखाद्या अविकसित भागात द्या. (Ashok Chavan)
Mla Ashok Chavan News, Aurangabad
Mla Ashok Chavan News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : दीड लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवल्यावरून राज्यातील महाविकासआघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोदींना फोन केला तेव्हा त्यांनी वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. यावर देखील आता टीका होऊ लागली आहे.

माजीमंत्री आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर टीका केली असून आधी गुजरातला पळवलेला वेदांता फॉक्सकॉन परत करा, मोठ्या प्रकल्पाचं चॉकलेट देऊ नका, असा टोला लगावला आहे. (Maharashtra) अशोक चव्हाण यांनी या संदर्भात एक ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

चव्हाण आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, २४ जूनला नवी दिल्लीत 'वेदांता-फॉक्सकॉन' तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना सकारात्मक प्रतिसाद देते. २६ जुलैला नवीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमवेत कंपनीचे संचालक सुहास्यवदनाने छायाचित्रे काढतात. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री विधानसभेत देतात.

तरीही हा प्रकल्प अचानक गुजरातला का जातो, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. नवीन सरकारने महाविकास आघाडीकडे बोट दाखवण्यात काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा हा प्रकल्प परत आणण्याचे प्रयत्न करणे राज्यासाठी अधिक हितावह ठरेल.

Mla Ashok Chavan News, Aurangabad
पंजाबमध्येही अॉपरेशन लोटस? २५ - २५ कोटींची आँफर : केजरीवालांचा आरोप

हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यात अर्थ नाही. राज्याने केंद्राला सांगावं की भविष्यात जो मोठा प्रकल्प तुम्ही महाराष्ट्राला देऊ करता आहात, तो आमच्या एखाद्या अविकसित भागात द्याच. पण अोदर पळवून नेलेला वेदांता-फॉक्सकॉन परत करा. भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in