Ajit Pawar vs Ashish Shelar : फडणवीसांच्या 'त्या'आरोपावरून आशिष शेलार-अजित पवारांमध्ये जुंपली

Maharashtra Politics : कोण काय म्हणाले आहेत, त्यांना उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाही.
Ajit pawar - Ashish Shelar
Ajit pawar - Ashish Shelar Sarkarnama

Ajit Pawar On Ashish Shelar : भाजपावर आरोप करणाऱ्यांनी तोंड बंद करावीत. अन्यथा देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत होतं, ते मी नावासहित उघड करेन असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला होता. आता त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेलारांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, कोण काय म्हणाले आहेत, त्यांना उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी अडीच वर्ष उपमुख्यमंत्री असताना मी जे काही निर्णय घेतले त्यात देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा चर्चा झालेली नाही असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे.

Ajit pawar - Ashish Shelar
Phaltan : गडकरींच्या कार्यक्रमाला रामराजेंची उपस्थिती; अनेकांच्या भुवया उंचावल्या

यावेळी त्यांनी फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत होतं, ते मी नावासहित उघड करेन असा इशारा देणार्या भाजप नेते आशिष शेलारांवर बोलणार्यांनी स्पष्ट बोलावे, कोड्यात बोलू नये पलटवार केला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, मी त्यावेळीही सांगितंल होतं आणि आत्ताही सांगतो, पहाटेच्या शपथविधीचा विषय मी कदापीही काढणार नाही. त्यावर मी काहीही बोलणार नाही असं म्हणत या विषयावर अधिक भाष्य करणं टाळलं.

Ajit pawar - Ashish Shelar
Sambhaji Raje News : संभाजीराजेंनी घेतली कट्टर भाजपविरोधक मुख्यमंत्र्यांची भेट : महाराष्ट्रात रंगली ‘या’ गोष्टीची चर्चा!

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा साक्षीदार मी आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या खासगी जागेत 250 पानांचा रिपोर्ट ठेवला होता. त्यानंतर तो सार्वजनिक ठिकाणी आणला. तो रिपोर्ट मी स्वतः वाचला आहे. त्या रिपोर्टमध्ये कोणत्या पानावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, हे मी पाहिलं होतं. दुसऱ्या गोष्टीच्या चौकशीत तिसरी गोष्ट आणण्याचा प्रयत्न तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून सुरु होता असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com