Asaduddin Owaisi : पंकजा मुंडेंनी एमआयएमसोबत यावे, ही तर ओवेसींची इच्छा..

Aurangabad : इम्तियाज जलील यांची जी इच्छा आहे, तीच आपली देखील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Asaduddin Owaisi-Imtiaz-Munde News, Aurangabad
Asaduddin Owaisi-Imtiaz-Munde News, AurangabadSarkarnama

Aimim : पंकजाताई निर्णय घ्या, बाहेर पडा आणि ओबोसींची ताकद दाखवून द्या. भाजप तुमचा रबरी शिक्का म्हणून वापर करत आहे. ओबीसी आणि मुस्लिम एकत्र आले तर या महाराष्ट्रात काय घडू शकते हे दाखवून देवू, असे आवाहन करत (Aimim) एमआयएमचे खासदार तथा राज्याचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना ऑफर दिली होती. मुळात पंकजा यांनी एमआयएम सोबत यावे, ही आपलीच इच्छा असल्याचे पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

Asaduddin Owaisi-Imtiaz-Munde News, Aurangabad
Vanchit Aghadi News: एमआयएमला सात महिन्यात सोडचिठ्ठी ; शिवसेनेशी आंबेडकरांची युती किती काळ टिकेल ?

औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांनी जी इच्छा व्यक्त केली, तीच आपली देखील आहे. (Imtiaz Jalil) `इम्तियाज जलील की आवाज ही मेरी आवाज है`, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना दिलेल्या ऑफरचे समर्थन केले. भाजपच्या मिशन लोकसभा प्रवास योजने दरम्यान चंद्रपूर, औरंगाबाद येथील सभेसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

त्यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणातून दूर लोटले जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ही संधी साधत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना एमआयएमसोबत येण्याची ऑफर दिली. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या किंवा त्यांना पक्षाकडून डावलले जाते, अशा चर्चा सुरू होतात तेव्हा एमआयएमकडून त्यांना साद घातली जाते. इम्तियाज जलील यांनी यापुर्वी देखील पंकजा मुंडे यांना निर्णय घेण्याचे आवाहन केले होते.

चिकलठाणा विमातळावर ओवेसी यांना जेव्हा याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा इम्तियाज जलील यांची जी इच्छा आहे, तीच आपली देखील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इम्तियाज जलील हे आमच्या पक्षाचे खासदार आहेत, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एक जबाबदार नेता म्हणून त्यांनी व्यक्त केलेल्या मतापेक्षा माझे मत वेगळे कसे असू शकेल. पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ओबीसींची मोठी ताकद आहे. त्यांनी योग्य निर्णय घेतला आणि आमच्या सोबत आल्या तर निश्चित राज्यात वेगळे चित्र दिसेल, असेही ओवेसी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in