विमानाने उड्डाण भरताच प्रवाशाचा रक्तदाब वाढला, डाॅ.कराडांनी केले जागेवरच उपचार

(Central State Finance Minister Dr. Bhagwat Karad) कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याची ताबडतोड सुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते
विमानाने उड्डाण भरताच प्रवाशाचा रक्तदाब वाढला, डाॅ.कराडांनी केले जागेवरच उपचार
Central Minister Dr. KaradSarkarnama

औरंगाबाद ः केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या डाॅक्टरी पेक्षाची झलक ते मंत्री झाल्यानंतरही अनेकदा पहायला मिळाली. औरंगाबादेत रस्त्यावर रिक्षा उलटली तेव्हा त्यांनी मंत्रीपदाचा कुठलाही बडेजाव न दाखवता गाडीतून उतरून जखमी मुलावर जागेवर प्राथमिक उपचार करून नंतर त्याला आपल्याच गाडीतून रुग्णालयात भरती केले होते. आता तर विमान प्रवासात देखील त्यांनी अचानक रक्तदाब वाढलेल्या प्रवाशाला बरे केल्याचे समोर आले आहे.

व्यक्ती कितीही मोठ्या पदावर गेला तरी आपला मुळपेशा आणि त्याद्वारे इतरांना मदत करण्याचे कर्तव्य विसरत नाही हेच डाॅ. कराड यांच्या कृत्तीतून पुन्हा एकदा दिसून आले आहे. डाॅ. भागवत कराड हे बालरोग तज्ञ व शल्यचिकित्सक आहेत. मराठवाड्यातील पहिले बाल शल्यचिकित्सक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या आहेत.

आता तेच डाॅक्टर कराड हे देशाची गुतांगुतीची अर्थव्यवस्था योग्य मार्गवर आणण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पण हे करत असतांनाच त्यांचा डाॅक्टरी पेशा आणि त्यांच्या या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव संकट समयी ते वापरतात. औरंगाबादमधील रिक्षा अपघातानंतर आता दिल्ली ते मुंबई प्रवासा दरम्यान देखील त्यांनी आपल्या डाॅक्टरी पेशाच्या अनुभवावर एका प्रवाशाला बरे केले.

कराड हे काल इंडिगो विमानाने दिल्लीहून-मुंबई मार्गे औरंगाबादला येण्यासाठी निघाले होते. दिल्ली विमानतळावरून विमानाने टेकआॅफ केले आणि अचानक एका प्रवाशाचा रक्तदाब वाढला आणि तो बेशुद्ध होऊन सीटवरच कोसळला. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. तो गोंधळ पाहून डाॅ. भागवत कराड आपल्या सीटवरून उठले आणि बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाच्या दिशेने गेले.

आपण डाॅक्टर असल्याचे त्यांनी सांगितले आणि बेशुद्ध झालेल्या प्रवाशाची नाडी तपासली. रक्तदाब वाढल्याने या प्रवाशाला चक्कर आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने प्रथोमचार म्हणून सदर प्रवाशाला काही औषधी देण्यास सांगितले, त्यानंतर तो प्रवासी शुद्धीवर आला. डाॅ.भागवत कराड यांनी योग्यवेळी प्रवाशावर उपचार दिल्याने पुढील अनर्थ टळला, त्यामुळे प्रवाशांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, या प्रकाराची माहिती सोशल देतांना डाॅ. कराड म्हणाले, काल प्रवासा दरम्यान इंडिगो फ्लाइटमध्ये 12 A सीट वर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो, विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याची ताबडतोड सुश्रुषा केली.

Central Minister Dr. Karad
गायीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री भर रस्त्यात धावपळ; व्हिडीओ व्हायरल

आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. " एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ " संतांची हि शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन देखील कराड यांनी यानिमित्ताने केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in