काॅंग्रेस नगरसेवकाला अटक होताच आमदार प्रज्ञा सातव पोलीस ठाण्यात धडकल्या

पोलिसांनी किरकोळ भांडणाच्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवकाच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आरोप सातव यांनी केला. (Mla Prdnya Satav)
Congress Mla Pradnya Satav
Congress Mla Pradnya SatavSarkarnama

हिंगोली : दिवंगत काॅंग्रेस नेते खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सांभाळणार, त्यांना सोबत घेऊन सातव यांचे अपुर्ण राहिलेले स्वप्न पुर्ण करणार, असा विश्वास प्रज्ञा सातव यांनी दिला होता. (Hingoli) विधान परिषदेवर आमदार झाल्यानंतर प्रज्ञा यांनी हिंगोली जिल्ह्यात संघटनेची सुत्रे हाती घेतली आहेत. (Pradnya Satav) पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात पक्षाचा नगरसेवकाला अटक केल्याचे कळताच प्रज्ञा सातव रात्रीच पोलिस ठाण्यात धडकल्या. (Congress)

पोलिसांना कोणत्या कायद्याखाली आमच्या कार्यकर्त्याला अटक केली याचा जाब विचारत त्यांनी तिथेच ठिय्या मांडला. प्रज्ञा सातव यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपण अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दाखवून दिल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात होत आहे.

काँग्रेस नगरसेवका विरोधा खोटा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आमदार सातव चांगल्याच संतापल्या होत्या. विरोधकांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी काम करू नये, आम्हालाही तसे करता येते, असे म्हणत त्यांनी रुद्रावतार धारण केला होता. मध्यरात्री कळमनुरी पोलीस स्थानकात तासभर ठिय्या देत त्यांनी नगरसेवकावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या, अशी मागणी केली.

पोलिसांनी किरकोळ भांडणाच्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवकाच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आरोप सातव यांनी केला. हिंगोली जिल्हा पोलीस स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचेही त्या म्हणाल्या.

Congress Mla Pradnya Satav
लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनीसृष्टीतील एक अद्भुत चमत्कार; आचार्य अत्रेंचे ते पत्र पुन्हा चर्चेत

दरम्यान कळमनुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत सातव यांनी तातडीने काँग्रेस कार्यकर्ते व नगरसेवकांच्या विरोधात दाखल केलेला गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्या, व राजकीय दबावास बळी पडून काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्रास देणे थांबवा अन्यथा आपण या विरोधात विधान भवनात आवाज उठवू, असा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिला.

महिला लोकप्रतिनिधी मध्यरात्री पोलीस स्थानकात आल्याचे समजताच , वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस स्थानकात दाखल होत प्रज्ञा सातव यांचे म्हणणे ऐकून घेत या प्रकरणात योग्य तपास करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com