Pankaja Munde News : मी प्रोटोकॉल पाळतेच; असं सांगणाऱ्या पंकजांच्या प्रोटोकॉलमध्ये फडणवीस नाहीत का?

राजासारखं मन असलं पाहिजे, राजाला फाटके कपडे घातले तरी तेज लपत नाही, या त्यांच्या वाक्यातूनही अनेक अर्थ निघतात.
Pankaja Munde News
Pankaja Munde News

दत्ता देशमुख

Beed Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन दौऱ्यांतील मुंडे भगीनींच्या गैरहजेरीची चर्चा आणि त्यावरुन होणाऱ्या अंदाजांवर माझी काहीही नाराजी व खदखद नाही, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्पष्ट केले असले तरी त्यांच्या भाषणातून त्यांनी सौम्य शब्दांत मनातील खदखद व्यक्त केली. मी प्रोटोकॉल पाळते, नड्डा, बावनकुळेंच्या दौऱ्यात आले हे निष्ठून सांगतानाच त्यांनी फडणवीसांच्या दौऱ्यात न येण्याचे सांगितलेले कारण प्रोटोकॉलनुसार सत्य असले तरी दोघांमध्ये म्हणावा तेवढा चांगुलपणा नाही, हेही यातून स्पष्ट होते.

पंकजा मुंडेंच्या भाषणात कोणी कोणाकडे गेले तरी कशाला आडवू, हार - तुरे द्या, भेटी घ्या, जिल्ह्याच्या विकासाला निधी मिळत असेल तर मी कशाला आडवू, असे सांगून पंकजा मुंडेंच्या नजरेतून जिल्ह्यातील नेत्यांची ‘उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी असलेली थेट लाईन’सुटलेली नाही, हेही स्पष्ट झाले. मी नको म्हणाले नाही, नाही म्हणाले तर काय करतील हे माहीत नाही, हे त्यांचे वाक्य देखील बरेच काही सांगून जाते.

Pankaja Munde News
Shivshakti-Bhimshakti Alliance : उद्धव ठाकरे उद्या युतीची घोषणा करणार?

फडणवीस यांच्या दोन दौऱ्यांतील मुंडे भगीनींच्या चर्चांना पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रीया देत खद्खद् नसल्याचे सांगितले. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा औरंगाबाद दौरा व शुक्रवारच्या (ता. २०) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यात मुंडे सहभागी झाल्या. यातील भाषणात त्यांनी भाजपच्या संस्कारात वाढलेली असून प्रोटोकॉल पाळते असे निक्षून सांगितले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आपले आहेत, किरण पाटलांना कशाला अडवे येऊ, असेही त्या म्हणाल्या. कोणी कुणाकडे जात असेल तर मी कशाला अडवू, हार घाला, निधी मिळतोय, मी कशाला आडवू. नको म्हणाल्यानंतर काय करतील मला माहित नाही असेही त्या म्हणाल्या. आपली काहीही अपेक्षा नाही, नाराजीचे कारण नाही. राजासारखं मन असलं पाहिजे, राजाला फाटके कपडे घातले तरी तेज लपत नाही, या त्यांच्या वाक्यातूनही अनेक अर्थ निघतात.

साहेबांनाही (दिवंगत मुंडेंना) त्रास व्हायचा, ते म्हणायचे आपले मीठच आळणी आहे, ज्यांना मोठं केलं त्यांच्याकडूनच त्रास व्हायचा, हा इतिहास, ही परंपरा असल्याचे सांगत वावड्यावर लक्ष देऊ नका, असे आवाहन करत भाजप वाढविण्याच्या दृष्टीने कोणी आले तर मी त्यांचे स्वागतच करते, असे म्हणून त्यांनी आपल्या राजकीय ताकदीचाही हुळवार उल्लेख केला.

‘भगवान भक्तिगडावर मोठी गर्दी जमते, ती शक्ती आहे, त्यामुळे आयत्या कार्यक्रमात जायला मला रस वाटत नाही’असा अप्रत्यक्ष टोलाही लगावला. भाजपमध्ये अध्यक्ष श्रेष्ठ त्यामुळे त्यांचा सन्मान असल्याचे सांगून आम्ही संस्कारप्रमाणे समोरून बोलणारे आहोत, मागून वार करणारे लोक नाहीत, कोणाच्या दुसऱ्याच्या ताटात दोन घास खायची इच्छा नाही, हेही त्यांनी सौम्य शब्दात बोलून दाखवत खदखद व्यक्त केली. उदास राहू नका, माझ्याकडे बघा, ताकदीने लढायची तयारी असली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

दुसऱ्या फळीची पाचावर धारण

दरम्यान, राज्यात सत्तांतरानंतर जिल्ह्याच्या वाट्याला मंत्रीपद आले नसले तरी पहिल्या फळीतील नेत्यांना विकासनिधी सढळ हाताने मिळत आहे. पुर्वी पंकजा मुंडेंच्या अपरोक्ष कोणत्याही नेत्याकडे जिल्ह्यातील नेते जात नसत. आता सर्वांनी स्वतंत्र लाईन धरली आहे. मात्र, मुंडे - फडणवीस यांच्यातील संबंधात वरोपचारी काहीही असले तरी वास्तविक काय हे सर्वांनाच कळाले आहे. मुंडेंनी भाषणात देखील याचा हळुवार उल्लेख केलाच आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यावर पूर्णत: अवलंबून असलेल्या नेत्यांना भविष्यात मुंडेंना ‘थेट मुंबईवाऱ्या’ आवडल्या नाहीत तर काय, अशी भीती असून आता नाही गेले तर निधीही नाही आणि ‘लाईन’ही तुटेल, अशी दुसरी भीती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com