Bhumre : जेवढी गर्दी तेवढा निधी, मुख्यमंत्र्यांच्या सभेचे निमंत्रण घरोघरी द्या...

पैठणला सभेसाठी यायचे. गाड्यांची व्यवस्था केली आहे, लागेल तेवढ्या गाड्या देवू, पण मुख्यमंत्र्यांच्या सभेला मोठी गर्दी जमली पाहिजे. ( Minister Sandipan Bhumre)
Minister Bhumres Son Appeal News Aurangabad
Minister Bhumres Son Appeal News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या १२ सप्टेंबर रोजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या बिडकीन मतदारसंघात येणार आहेत. विविध विकासकामांचे भूमीपूजन उद्धाटन, नागरी सत्कार सोहळा व सभा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन भुमरे यांच्यावतीने करण्यात आले आहे. (Paithan) पैठणमधील मुख्यमंत्र्यांचा सत्कार आणि सभा एवढी मोठी झाली पाहिजे, की त्यांनी महाराष्ट्रात आपल्या सभेचा उल्लेख केला पाहिजे. (Shivsena) त्यासाठी जसं घरी लग्नकार्य असल्यावर आपण घरोघरी जाऊन निमंत्रण देतो, तसेच या सभेचे निमंत्रण द्या, असे आवाहन मंत्री महोदयाचे चिरंजीव विलास भुमरे हे सध्या करतांना दिसत आहेत.

जेवढी मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी, तेवढा जास्त निधी, असा दावा देखील ते करत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात त्यांच्या खांद्याला खांदा लावून वावरलेले संदीपान भुमरे यांना नव्या सरकारमध्ये देखील रोजगार हमी खात्याचीच जबाबदारी देण्यात आली. मत्रीमंडळातील दुसरे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपद मिळण्याआधीच अब्दुल सत्तार यांना मतदारसंघात आणून मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. पण भुमरेंना मात्र ती संधी अजून मिळाली नव्हती. पण उशीरा का होईना पैठणमध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या समक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी भुमरे पिता-पुत्रांनी सुरू केली आहे.

भुमरे यांचे चिरंजीव विलास हे जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती होते. पैठणचे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सहाजिकच १२ सप्टेंबर रोजी होणारी मुख्यमंत्र्यांची सभा यशस्वी करण्याची जबाबदारी विलास भुमरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. यासाठी पैठण तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये ते नियोजनासाठी बैठका, काॅर्नर सभा घेत आहेत. संदीपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ब्रम्हगव्हाण योजनेला साडेनऊशे कोटी रुपये मंजुर केले, ही छोटी गोष्ट नाही. त्यामुळे त्यांच्या सभेला गर्दी झाली पाहिजे, असे आवाहन ते करत आहेत.

Minister Bhumres Son Appeal News Aurangabad
Shivsena : मुंबई महापालिकेत १५१ जागा येतील, उद्धव ठाकरेंनी सायलेंट प्लानिंग केलयं..

ढोरकीन, बिडकीनला मुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे, पण तो झाल्यानंतर निघून जायचे नाही, तर पैठणला सभेसाठी यायचे. गाड्यांची व्यवस्था केली आहे, लागेल तेवढ्या गाड्या देवू, पण मुख्यमंत्र्यांच्या सभेला मोठी गर्दी जमली पाहिजे. मुख्यमंत्र्यांसमोर शक्तीप्रदर्शन करण्यात यशस्वी ठरलो तर भविष्यात भुमरे साहेबांना मतदारसंघासाठी आणखी निधी मिळवण्यात अडचणी येणार नाहीत, असेही विलास भुमरे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in