किरीट सोमय्या प्यादे, त्यांचे बोलवते धनी तर रावसाहेब दानवे

(Shivsena Leader Arjun Khotkar)जालना जिल्ह्याच्या राजकारणात रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जून खोतकर यांचा राजकीय संघर्ष नवा नाही. एकमेकांवर कुरघोडी आणि पंख छाटण्याची एकही संधी हे दोघे सोडत नाहीत.
किरीट सोमय्या प्यादे, त्यांचे बोलवते धनी तर रावसाहेब दानवे
Raosaheb Danve-Arjun KhotkarSarkarnama

जालना ः किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे त्यांनी केलेले नाहीत, ते तर केवळ प्यादे आहेत, त्यांचे बोलवते धनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन अर्जून खोतकर यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा करत जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखाना व कारखान्याची शंभर एकर जमीन हडपल्याचा आरोप केला.

या आरोपाला खोतकर यांनी उत्तर दिले. खोतकर म्हणाले, किरीट सोमय्या यांच्यावर पक्षाने उठसूठ विरोधकांवर आरोप करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे ते प्रामाणिकपणे ती जबादारी पार पाडत आहेत. त्यांनी केलेले आरोप खोटे आणि हास्यास्पद आहेत. पण या प्रकरणात ते केवळ प्यादे आहेत, त्यांचे बोलवते धनी दुसरे म्हणजेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आहेत.

दानवे यांनी स्वतः काही दिवसांपुर्वी सोमय्या यांच्या सोबत जालना कारखान्या संदर्भात चर्चा करतांनाचा फोटो ट्विट केला होता, असा दावा करत खोतकर यांनी प्रसार माध्यमांना तो फोटोच दाखवला. रामनगरचा जालना सहकारी साखर कारखाना माझ्या मालकीचा नाही, मी त्याचा फक्त शेअरहोल्डर आहे.

शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप असेल तर मी जमीनीसह तो कारखाना सोमय्या यांना विकत द्यायला सांगतो, असेही ते खोतकर म्हणाले. जालना जिल्ह्याच्या राजकारणात रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जून खोतकर यांचा राजकीय संघर्ष नवा नाही. एकमेकांवर कुरघोडी आणि पंख छाटण्याची एकही संधी हे दोघे सोडत नाहीत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी दानवेंना आव्हान देत निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. तेव्हा देखील या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे जाहीर सत्र सुरू होते. परंतु लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली आणि रावसाहेब दानवे यांनी तेव्हा फडणवीस यांच्या मार्फत उद्धव ठाकरे यांना खोतकरांना माघार घ्यायला भाग पाडले होते.

Raosaheb Danve-Arjun Khotkar
खोतकरांनी जालना सहकारी साखर कारखाना व एक हजार कोटींची जमीन बळकावली

त्याबदल्यात विधानसभा निवडणुकीत याची परतफेड करू आणि खोतकरांना प्रचंड मतांनी निवडून आणू असा शब्द देखील दिला होता. मात्र प्रत्यक्षात विधानसभा निवडणूकीत खोतकरांचा पराभव झाला. यामागे देखील दानवे यांचाच हात होता असे बोलले जाते. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर खोतकरांनी थेट रावसाहेब दानवे यांचे नाव घेत या प्रकरणाचे बोलवते धनी तेच असल्याचा आरोप केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in