खोतकरांना हवी जालन्याची जागा; दानवे म्हणाले, 'बापाची जहागिरी थोडीच आहे?'

अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी आज एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे
Raosaheb Danve-Arjun Khotkar
Raosaheb Danve-Arjun KhotkarSarkarnama

औरंगाबाद : एकेकाळचे कट्टर विरोधक भाजप (BJP) नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि शिवसेना (Shivsena) नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आता एकनाथ शिंदे गटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. खुद्द दानवे यांनीच राजकारणात कोणी शत्रु नसते किंवा मित्रही नसते, अस म्हटले. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी खोतकर यांनी जालना लोकसभेची जागा मागितली. त्यावरून दानवे चांगलेच संतापले. खोतकर-दानवे यांच्यातील वैर खरच संपले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खुद्द दावनेंनीच मला लोकसभेला समर्थन द्या, तुम्हाला दुसरी जागा देता येईल. कारण ही जागा भाजपची असून मीच विद्यमान खासदार आहे, असे म्हटले. त्यावर मी त्यांना म्हटले की, हा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाका. शिवाय, तुम्ही अनेक वर्षे इथून लढत आहात आता ती मला लढवू द्या, असे मी त्यांना म्हटल्याचे खोतकर यांनी सांगितले.

Raosaheb Danve-Arjun Khotkar
फडणवीसांचे मोठे वक्तव्य; धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील

खोतकर यांच्या या दाव्यानंतर रावसाहेब दानवे संतप्त झाले. दानवे म्हणाले, जालना लोकसभेची जागा रावसाहेब दानवेच्या बापाची जहागिरी थोडीच आहे. याच्यावर अधिकार रावसाहेब दानवेंचा थोडीच आहे. उद्या पक्षाचे सरचिटणीस मुलतानी हे देखील तिथून उभे राहू शकतात. ते आणि मी खुर्च्या टाकून जागांचे वाटप करत बसलो तर झालेच. तो काय जालन्यातला पक्ष आहे का, असा सवाल करत भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याचे दावने यांनी सांगितले.

Raosaheb Danve-Arjun Khotkar
अखेर मुख्यमंत्र्यांना अमित शहांची वेळ मिळाली; औरंगाबादवरुन रात्रीच दिल्ली गाठणार...

एकंदरीतच रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दानवे-खोतकर यांच्यातील मतभेद दूर झाले की आणखी वाढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तत्पूर्वी खोतकर म्हणाले होते, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी माझे सविस्तर बोलणे झाले. माझ्यावर ओढवेलली माहिती मी पक्षप्रमुखांना सांगितली. त्यानंतर मी खासदार संजय राऊतांशी बोललो. जिल्ह्यातील नेत्यांशीही बोललो. मी ४० वर्षांचा सच्चा शिवसैनिक आहे. कुटुंबियांसाठी मला काही निर्णय करणे गरजेचे आहे. मी उद्धव ठाकरेंची परवानगी मागितली. त्यानंतर मी आज शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in