Jalna : खोतकरांचे उपनेते पद म्हणजे जुना भिडू, नवा राज...

अर्जून खोतकर हे आक्रमक आणि विरोधकांना विशेषतः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पुरून उरणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. (Shivsena Leader Arjun Khotkar)
Ex.Minister Arjun Khotkar-Uddhav Thackeray
Ex.Minister Arjun Khotkar-Uddhav ThackeraySarkarnama

जालना : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड आणि त्याचे हादरे सुरू असतांनाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, (Udhhav Thackeray) आदित्य ठाकरे, संजय राऊत हे नेते डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत. कधी नव्हे ते वेगवान निर्णय घेतले जात आहेत. बंडखोर किंवा पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांची पदावरून हकालपट्टी आणि नव्या नियुकत्यांच्या सपाटा सध्या सुरू आहे. (Jalna) गेल्या २५-३० वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असलेले माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना पक्षाने बढती देत त्यांना आता उपनेते केले आहे.

शिवसेनेकडून काही उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, त्यात अर्जून खोतकर यांचे देखील नाव आहे. अर्जून खोतकर हे नाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे, ते त्यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे. (Marathwada)अर्जून शुगर यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या रामनगर सहकारी साखर कारखान्यातील खरेदी-विक्री व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच ठपका ठेवत ईटडीने कारखान्याची ७२ कोटींची मालमत्ता गेल्या महिन्यात जप्त केली होती.

एकनाथ शिंदे यांचे बड झालेले असतांना, ईडीने फास आवळलेला असतांना देखील खोतकरांनी शिवसेनेचा धनुष्यबाण आणि भगवा खाली ठेवला नाही. बहुदा त्याची बक्षिशी म्हणूनच त्यांना बढती देण्यात आल्याचे दिसते. शिंदे यांच्या बंडानंतर पक्षात वर्षानुवर्ष नेत्यांच्या मागे-पुढे फिरणाऱ्या किंवा तळागाळात काम करणाऱ्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु अर्जून खोतकर यांच्या निवडीने ती आशा धुळीस मिळाली असेच म्हणावे लागेल.

अर्जून खोतकर हे पक्षातील जने आणि कसलेले नेते आहेत, याबद्दल दुमत नाही. परंतु त्यांनाच पुन्हा पद मिळणार असेल तर मग पक्षातील रांगेत असणाऱ्यांचा नंबर कधी लागणार? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थीत केला जात आहे. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांना पक्षाला पडलेले भगदाड बुजवायचे असेल तर साम,दाम, दंड, भेद यात निपून असलेले नेतेच मोठे करावे लागतील, हेच या नियुक्तीवरून स्पष्ट होते.

Ex.Minister Arjun Khotkar-Uddhav Thackeray
चोवीसशेचा डाय, चौदाशेची दाढी ; बंडखोर आमदारांची गुवाहाटीच्या हाॅटेलात मज्जाच भारी..

अर्जून खोतकर हे आक्रमक आणि विरोधकांना विशेषतः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पुरून उरणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत दानवे विरुद्ध लढण्याची घोषणा खोतकरांनी केली तेव्हा त्यांची झालेली पळापळ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली होती. तेव्हा देखील उद्धव ठाकरे यांचा आदेश म्हणून खोतकरांनी तलावर म्यान केली होती. पण खुन्नसी राजकाणासाठी ओळखल्या जाणाऱ्या दानवेंनी विधानसभा निवडणुकीत खोतकरांचा काटा काढला.

त्यामुळे गेल्या अडीच वर्षात खोतकरांसमोरील अडचणीत बरीच वाढ झाली होती. ईडीचा ससेमिरा ही दानवेंचीच देण होती हे देखील आता स्पष्ट झाले आहे. अशावेळी शिवसेनेच्या नेतृत्वाने खोतकरांची उपनेतेपदी निवड करून त्यांना पर्यायाने जालना व मराठवाड्यातील शिवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

खोतकर यांना आता दानवे आणि गोरंट्याल अशा दोघांना जिल्ह्यात तोंड द्यावे लागणार आहे. त्यासोबतच राज्यात लागलेले बंडखोरीचे ग्रहण आपल्या जिल्ह्यात येणार नाही याची देखील खबरदारी घ्यावी लागणार आहे. एकंदरित खोतकरांचे उपनेतेपद म्हणजे जुना भिडू, नवा राज असेच याचे वर्णन करावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in