आमचे घरभाडे काढता, तुम्हाला लाज वाटत नाही का ? शिक्षकाने बंब यांना विचारला जाब..

माझी मुलं जिल्हा परिषद शाळेतच शिकली. तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकले ते सांगा, असे म्हणत शिक्षकानेही आक्रमक पावित्रा घेतला. (Mla Prashant Bamb)
Mla Prashant Bamb Audio Clip News Aurangabad
Mla Prashant Bamb Audio Clip News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : गंगापूर-खुल्ताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत काल ग्रामसेवक, अधिकारी व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या संदर्भात एक विधान केले. शासनाचा पगार घेऊन हे लोक कामंच करत नाहीत, असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. (Aurangabad) पण खान्देशातील एका शिक्षकाच्या हा आरोप चांगलाच जिव्हारी लागला आणि त्याने थेट (Prashant Bamb) आमदार प्रशांत बंब यांना फोन करून जाब विचारला.

बंब आणि त्या शिक्षकामध्ये झालेले संभाषण, वादाचा आॅडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतोय. संतापलेल्या शिक्षक महोदयांनी थेट आमदारांची लाजच काढली आणि तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकवता असा सवालही केला. (Marathwada) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शालेय शिक्षण विभागाशी संबंधित एका विषयावर आपले मत मांडतांना आमदार प्रशांत बंब यांनी बदलीच्या ठिकाणी न थांबता घरभाडे व इतर भत्ते घेणाऱ्या ग्रामविकास अधिकारी, तलाठी, शिक्षक व इतर अधिकाऱ्यांवर टीका केली.

अधिकारी, शिक्षक नोकरीच्या ठिकाणी मुक्कामी थांबत नसल्याने विद्यार्थी व नागरिकांचे कसे नुकसान होते हे बंब यांनी आक्रमकपणे सांगण्याचा सभागृहात प्रयत्न केला. परंतु बंब यांचा हा आरोप खान्देशातील एका शिक्षकाच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे त्याने थेट बंब यांना फोन लावून काल तुम्ही सभागृहात केलेला आरोप कसा चुकीचा आहे हे पटवून द्यायला सुरूवात केली.

घरभाडे फक्त शिक्षकच घेतात का? असा सवाल करत या संभाषणाला सुरूवात झाली. आमदार बंब यांनी मी फक्त शिक्षकांबद्दल नाही तर ग्रामसेवक बीएलओ, अधिकारी व शालेय शिक्षण विभागीशी संबंधित विषय असल्यामुळे शिक्षकांविषयी बोललो असे सांगत होते. तेव्हा तुम्ही ज्या औरंगाबाद जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शाळेत शौचालय नाही, शाळेवरची पत्र उडून गेलेली आहेत, मुलं उघड्यावर शौचालयाला बसतात. त्याकडे तुमचे लक्ष नाही आणि तुम्ही शिक्षकांच्या घरभाड्यावर कसे बोलता?

Mla Prashant Bamb Audio Clip News Aurangabad
'अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी सही केली'

असा प्रश्न शिक्षकाने केला त्यावर शाळेला शौचालय नाही तर तुम्हाला लाज वाटत नाही का? असे बंब म्हणाले, त्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, अशा शब्दात शिक्षकाने बंब यांना सुनावले. आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शिकवतो, पण लोकप्रतिनिधी व सरकार आम्हाला कामच करु देत नाही, सारखं ही माहिती द्या, ती माहिती द्या म्हणत असतात. मग आम्ही मुलांना शिकवायचे कधी? असा प्रश्नही संबंधित शिक्षकाने बंब यांना केला.

तुम्ही पन्नास हजार रुपये पगार घेता आणि आपली मुलं दहा हजार रुपये फीस असलेल्या शाळेत पाठवता, असा आरोप बंब यांनी केला, त्यावर माझी मुलं जिल्हा परिषद शाळेतच शिकली. तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकले ते सांगा, असे म्हणत शिक्षकानेही आक्रमक पावित्रा घेतला. बराचवेळ दोघांमध्ये वाद सुरू होता, तेव्हा बंब यांनी तुम्ही तुमचे म्हणणे माझ्याकडे लेखी द्या, किंवा प्रत्यक्ष येऊन भेटा, असे म्हणत फोन ठेवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com