भुमरेंच्या मतदारसंघातील ८९० कोटींच्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला मंजुरी

योजना बरीच रखडल्यामुळे २००९ मध्ये २२२ कोटीची असलेली ही योजना ८९० कोटींवर पोहचली होती. (Mla Sandipan Bhumre)
Mla Sandipan Bhumre-Cm Eknath Shinde News
Mla Sandipan Bhumre-Cm Eknath Shinde NewsSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत आपले मंत्रीपद डावाला लावणारे माजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा विश्वास सार्थ ठरला आहे. (Paithan) भुमरे यांच्या मतदारसंघातील महत्वाकांक्षी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे ८९० कोटींच्या या योजनेमुळे तालुक्यातील ५५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून याशिवाय तब्बल ४२०० एकर जमीन पाण्याखाली येणार आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मतदारसंघातील विकासकामांना निधी मिळत नाही, अशी ओरड करत (Shivsena) शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले होते. त्यांनतर भाजपच्या पाठिंब्यावर (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यासाठी मंत्रीपदावर पाणी सोडणाऱ्या आमदारांसाठी आता शिंदे यांनी तिजोरीच खुली केली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

माजी महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांकडून आपल्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील विविध प्रकल्प आणि विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करुन घेतला होता. त्यानंतर आता संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाची ठरणार असलेल्या ८९० कोटींच्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला शिंदे-फडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे. ही योजना या सरकारच्या काळात पुर्ण झाली, तर भुमरे यांच्यासाठी २०२४ च्या विधानसभेचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या टप्यात अनेक अडथळे आले. पण त्यावर मात्र करत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता मिळवण्यात भुमरे यांना यश मिळाले होते. त्यामुळे आता योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकाला राज्याची मंजुरी मिळाली आहे. ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्याला २०१० मध्ये सुरूवात झाली होती. मात्र, या प्रकल्पांबाबत काही आक्षेप नोंदवण्यात आले होते. परंतु ते आक्षेप फेटाळत राज्य सरकारने प्रकल्पाला परवानगी दिली होती.

Mla Sandipan Bhumre-Cm Eknath Shinde News
राणे, कदम, शिंदे चालत नाही, ठाकरेंना मराठा नेतृत्व नकोय ? रामदासभाईंचा हल्ला..

योजना बरीच रखडल्यामुळे २००९ मध्ये २२२ कोटीची असलेली ही योजना ८९० कोटींवर पोहचली होती. सुधारित अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली असून शिंदे-फडणवीस मंत्रींडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमुळे ५५ गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा त्यांचा हक्क मिळणार आहे. पैठण तालुक्यातील योजनेच्या लाभक्षेत्रातील ५५ गावांना योजनेचा लाभ होणार असून हा भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. या भागातील शेतजमीन देखील पाण्याखाली येणार असल्याने ही योजना पैठण तालुक्यासाठी संजीवनी ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in