Jalna Maratha Protest : मराठ्यांचा लढा @ अंतरवाली सराटी : साडेतीन हजार लोकसंख्येच्या गावाने सत्ताधाऱ्यांना हादरवले..

Marathwada Political : अंतरावालीतील आंदोलनाचे पडसाद आसपासच्या गावातही उमटू लागले, कुठे रास्तारोको तर कुठे निदर्शने.
Jalna Maratha Protest News
Jalna Maratha Protest NewsSarkarnama

Maratha Aarakshan News: अवघ्या साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव, साडेसहाशे कुटुंब अन् सडपातळ शरीरयष्टीच्या कार्यकर्त्याने मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या आंदोलनाने अख्खी सत्ता हादरवून टाकली. आतापर्यंत कुणालाही माहित नसलेले जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे अंतरवाली सराटी गावात कधी नव्हे तो मंत्री, नेते, खासदार, आमदार आणि राज्यातील प्रत्येक पक्षाच्या पुढाऱ्याच्या गाड्यांचा धुराळा अनुभवला.

Jalna Maratha Protest News
Raj Thackeray On Fadanvis : तुम्ही विरोधी पक्षात असता तर काय केलं असतं ? राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले..

एक ते दीड किलोमीटरपर्यंत महागड्या कारच्या रांगा अंतरवालीतील आंदोलनाचे महत्व अधोरेखित करतात. (Maratha Reservation) ज्या गावात साध पोस्ट आॅफिस नाही, की एखादी सरकारी, खाजगी बॅंक, एवढेच काय तर बाजार भरण्याइतकी आर्थिक उलाढाल नसलेल्या अंतरवालीत जाण्यासाठी आणि तिथून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी राज्य आणि देशभरातील मिडिया इथे दाखल झाला आहे.

ओबी व्हॅन, कॅमेरे आणि हातात बूम घेऊन सर्वत्र फिरणारे चॅनलचे प्रतिनिधी हे चित्र सध्या अंतरवाली सराटीत पहायला मिळते आहे. (Jalna) जालन्यापासून ५२ किलोमीटर तर अंबड तालुक्यापासून २५ किमीवर असलेले अतरवाली सराटी व त्याचे नाव आज प्रत्येकांच्या तोंडावर आहे. (Marathwada) कुठल्याही राष्ट्रीय, राज्य एवढेच काय तर जिल्हा मार्गावरही नसलेल्या या गावाने गेल्या सात दिवसांपासून वेगळेच चित्र अनुभवले.

मनोज जरांगे पाटील या तरुण मराठा कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहून सगळेच थक्क झाले आहेत. २९ आॅगस्ट रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोजक्या सहकाऱ्यांसोबत जरांगे यांनी गावातील मारोती मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले. दोनच दिवसात या उपोषणाला जिल्हाभरातील शेकडो गावांचा पाठिंबा मिळाला. अंतरवालीत मराठा समाजाचे तरुण, महिला, वृ्द्ध दाखल होऊन जरांगे यांच्या मागणीला बळ देत होते. समाजासाठी उपोषणाला बसल्यानंतर मिळणारा प्रतिसाद पाहून जरांगे यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी आरक्षणाचा लढा तीव्र केला.

अंतरावालीतील आंदोलनाचे पडसाद आसपासच्या गावातही उमटू लागले, कुठे रास्तारोको तर कुठे निदर्शने यामुळे आंदोलनाची धग वाढत गेली. सुरुवातीच्या दोन दिवस या आंदोलनाकडे फारसे गांभीर्याने न पाहणाऱ्या जिल्हा प्रशासन व पोलिसांना अखेर अंतरवाली सराटीकडे धाव घ्यावीच लागली. पण आंदोलकांची समजूत काढून त्यांना माघार घ्यायला लावण्यात पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला अपयश आले आणि घडू नये ते घडले. तेव्हापासून अंतवाली सराटी धगधगत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com