बीड जिल्ह्यात आणखी एक काका- पुतणे लढत ; शाहू बॅंकेच्या निवडणुकीत समोरासमोर

दिवंगत अर्जुन जाहेर पाटील यांनी स्थापन केलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को - ऑप बॅंकेची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली आहे. (Beed District)
बीड जिल्ह्यात आणखी एक काका- पुतणे लढत ; शाहू बॅंकेच्या निवडणुकीत समोरासमोर
Urban Bank ElectionSarkarnama

बीड : राज्याच्या राजकीय इतिहासात काका-पुतणे आमने-सामने येण्याची जिल्ह्याची जुनी व मोठी परंपरा आहे. आता आणखी एक काका - पुतणे एकमेकांना भिडत आहेत. (Beed) श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को - ऑप बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजय जाहेर पाटील व बलभीम जाहेर पाटील यांच्यात लढत होणार आहे. (Marathwada) आता यात बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटूंबियांतील काका -पुतण्या अंक राज्यात गाजला. मात्र, त्यापूर्वीच जिल्ह्यात माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांना पुतणे बदामराव पंडित यांनी आव्हान उभे केले होते. पुढे मुंडे कुटूंबियांतील दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील काका - पुतण्या सामना राज्यात गाजला.

पाच वर्षांपूर्वी क्षीरसागर घराण्यातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील सामनाही लक्षवेधी ठरला. आता याच जिल्ह्यात पुन्हा जाहेर पाटील कुटूंबियांत काका - पुतणे समोरासमोर आले आहेत. दिवंगत अर्जुन जाहेर पाटील यांनी स्थापन केलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को - ऑप बॅंकेची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली आहे.

राज्यभराचे कार्यक्षेत्र असलेल्या बॅंकेचा मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, ठाणे अशा ११ जिल्ह्यांत विस्तार आहे. या बॅंकेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेण्यासाठी अर्जुनराव जाहेर पाटील यांचे चिरंजीव व सध्या बॅंकेचे अध्यक्ष असलेले अजय पाटील आणि त्यांचे चुलते बलभीमराव जाहेर पाटील मैदानात उतरले आहेत.

Urban Bank Election
महापालिकेची ग्रामीण भागात बससेवा सुरू, आमदार धीरज देशमुख म्हणाले, भैय्या आभार..

या दोन्ही काका - पुतण्यांनी कधी काळी बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत अर्जुनराव जाहेर पाटील यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम केलेले आहे. त्यामुळे सहकारातले खाच - खळगे दोघांनाही चांगलेच माहीत आहेत. विशेष म्हणजे अर्जुनराव जाहेर पाटलांचे वारसदार असा भावनिक मुद्दा दोघांकडूनही सभासदांसमोर मांडला जात आहे. आता बाजी मारुन वारसा कोण सिद्ध करणार, आणि बॅंकेच्या चाव्या कोण हाती घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.