किल्लारी परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का; जमिनीखालून रेल्वे धावल्याचा भास झाला

या भूकंपाने १९९३ मध्ये झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या.
Earthquake in Killari
Earthquake in KillariSarkarnama

विश्वनाथ गुंजोवटे

किल्लारी (जि. लातूर) : लातूर (Latur) जिल्ह्यातील किल्लारी (Killari) परिसराला शनिवारी (ता. १९) पहाटे पुन्हा भूकंपाचे (earthquake) धक्के बसले. किल्लारीसह परिसरातील पाच किलोमीटर अंतरात या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाने १९९३ मध्ये झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या. (Another earthquake hit Killari area)

औसा तालुक्यातील किल्लारीसह कारला, कुमठा, सिरसल, येळवट, मोगरगा, तळणी आणि निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा परिसरामध्ये पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी जाणवलेल्या भूकंपाची नोंद २.४ रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगण्यात आले. जमीन हादरल्याने अनेकांना जाग आली. जमिनीखालून एखादी रेल्वे धावत जावी, अशा पद्धतीचा भास या सौम्य धक्क्याने नागरिकांना झाला. पत्र्याच्या शेडमध्ये आवाज घुमू लागला. ज्यांना रात्री जाग आली, त्यांनी रात्र जागून काढली.

Earthquake in Killari
पवारांच्या नेतृत्वाखालील साखर कारखान्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

किल्लारी परिसराला भूकंप हा नेहमीचाच झाला आहे. वर्षातून किमान एक ते दोन वेळा असे भूकंपाचे सौम्य धक्के या भागामध्ये जाणवतात. सरकारने भूकंपापासून बचावासाठी अधिकची उपायोजना करणे अपेक्षित आहे.

Earthquake in Killari
खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का; पवनराजेंचे विश्वासू सहकारी शिंदे गटात प्रवेश करणार

भूकंप झाल्याची नोंद नवीन यंत्राद्वारे तंतोतंत होत आहे. रात्री झालेल्या भूकंपाची २.४ रिस्टर स्केल अशी नोंद झालेली आहे. हा भूकंपाचा सौम्य धक्का समजला जातो. यात नुकसान होण्याची प्रमाण अत्यल्प असते, असे लातूरचे माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी स्पष्ट केले.

भूकंपमापक इमारत धूळखात

सन ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर पुनर्वसनामध्ये भूकंप मापक यंत्राद्वारे नोंद होण्यासाठी या ठिकाणी भव्य अशी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, ती इमारत धूळखात पडून आहे. भूकंप झाल्यानंतर या ठिकाणी माहिती देण्यासाठी कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित राहत नाही. केवळ एक वॉचमन उपस्थित राहतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com