Anil Parab News : मुंबईतील दंगलीचा इतिहास तपासा, आम्ही देशद्रोह्यांविरोधात लढलो होतो

Maharashtra : मग तुम्ही संपुर्ण विरोधी पक्षाला देशद्रोही कसे म्हणालात? असा सवाल परब यांनी केला.
Anil Parab News, Mumbai
Anil Parab News, MumbaiSarkarnama

Budget Session : बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचे चहापान टळले, असे विधान केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी विधान परिषदेत काल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात खुलासा केला.

Anil Parab News, Mumbai
Eknath Shinde News : मी अजितदादांना देशद्रोही म्हणालो नव्हतो, मलिकांचा देशद्रोह्यांशी संबंध, ते बोलणारच..

मी अजितदादा, अंबादास दानवे यांना देशद्रोही म्हटलो नव्हतो. तर नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भातून मी त्यांना देशद्रोही म्हटलो होतो, असे स्पष्टीकरण दिले. यावर शिंदे यांच्या खुलाशाचा संदर्भ देत आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी जरा मुंबईतील ९२-९३ च्या दंगलीचा इतिहास तपासा, आम्ही देशद्रोह्यांच्या विरोधात लढलो होतो. तुम्ही देखील त्याचे साक्षीदार होतात.

आम्ही सातत्याने देशद्रोह्यांना विरोध करत आलेलो आहोत, मग तुम्ही संपुर्ण विरोधी पक्षाला देशद्रोही कसे म्हणालात? असा सवाल परब यांनी केला. आम्ही देशद्रोह्यांचे समर्थन करत नाही. आमच्यावर आरोप करतात, मग कुणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे हे सांगा ? २०१४ मध्ये राज्यात युतीचे सरकार होते, त्यात आम्ही देखील होतो, तुम्ही मंत्री होतात. तेव्हा नवाब मलिक देशद्रोही नव्हते का?.

आता तुम्ही सभागृहात सांगत आहात, की आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये असतांना सातत्याने बैठकीमध्ये मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो. पण तुम्ही कधीच मलिकांचा राजीनामा कोणत्याच बैठकीत मागितला नव्हता, असा पलटवार परब यांनी केला. सोयीच्या राजकारणासाठी आम्हाला देशद्रोही ठरवू नका. तुम्ही दाऊदला मुसक्या बांधून आणणार होतात त्याचे काय झाले? असा सवाल करतांना आम्हाला देशद्रोही ठरवत असाल तर मग या गुन्ह्यामध्ये तुम्हीही सहभागी होतात, असेही परब म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com