अमित देशमुख म्हणतात, पीक विमा कंपन्यांनी निकष बाजूला ठेवून मदत करावी..

( Guardian Minister) पीक विम्याचे ऑनलाईन व ऑफ लाईन पध्दतीने (Amit Deshmukh) संबंधीतांनी गाव पातळीवरच अर्ज स्वीकारावेत.
Minister Amit Deshmukh
Minister Amit DeshmukhSarkarnama

निलंगा : जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कपनीने निकष बाजूला ठेवून मदत करावी, असे आवाहन करतांनाच शासन देखील मदतीसाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

निलंगा तालुक्यातील गौर, मसलगा, ताजपूर, ढोबळेवाडी येथे मांजरा नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाच्या नुकसानाची पाहणी देशमुख यांनी आज केली. अमित देशमुख म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन मांजरा व तेरणा नदीच्या अतिरिक्त पुरामुळे शेतकऱ्यांच्या खरिप पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रशासनाने त्यांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर करावा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास आम्ही कटीबध्द आहोत. पीक विमा कंपनीकडूनही निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, अशी अपेक्षाही देशमुख यांनी व्यक्त केली.

पीक विम्याचे ऑनलाईन व ऑफ लाईन पध्दतीने संबंधीतांनी गाव पातळीवरच अर्ज स्वीकारावेत, अशा सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांनी तालुक्यातील गौर, मसलगा व ढोबळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या सूचना व मागण्याचे तात्काळ निराकरण करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Minister Amit Deshmukh
पोटनिवडणूकीसाठी भाजपकडे १२ इच्छूक; ४ ऑक्टोबरला होणार उमेदवाराची घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com