Amit Deshmukh : देशातील महाविकास आघाडीचे नेतृत्व राहुल गांधीच करतील

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कामाला लागले पाहिजे. (Amit Deshmukh)
Amit Deshmukh-Rahul Gandhi
Amit Deshmukh-Rahul GandhiSarkarnama

औरंगाबाद : देशात आघाडीचे वारे वाहत असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात उत्कृष्ट काम करून देशाला दिशा दाखविली आहे. (Rahul Gandhi) याच धर्तीवर देशातही महाविकास आघाडीचा प्रयोग होईल व त्याचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केला. काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाच्या मराठवाडा (Marathwada) विभागाची आढावा बैठक आज औरंगाबादेत पार पडली.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सचिव संपत कुमार, कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना अमित देशमुख म्हणाले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात पहिल्यांदा आघाडीचा प्रयोग केला. त्याची परंपरा सुशिलकुमार शिंदे यांनी पुढे चालविली. आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली.

कोविड काळात जगभरात रुग्णांचे हाल झाले, उपचार मिळाले नाहीत, म्हणून बळी गेले. पण आघाडी सरकारने कोरोना काळात अनेक क्षेत्रात केलेले काम देशात दिशादर्शक ठरले. देशातही महाविकास आघाडीचे वारे आहे. या महाविकास आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असा दावा देशमुख यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कामाला लागले पाहिजे. डिजिटल सदस्य नोंदणीसाठी केवळ एक महिना शिल्लक आहे. यापुढे कुठल्याही निवडणुकीत तिकीट मिळविण्यासाठी तुम्ही किती सदस्य केले? अशी विचारणा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून महाराष्ट्र देशात एक नंबरवर राहील, याची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

Amit Deshmukh-Rahul Gandhi
रावसाहेब दानवेंच्या सभेला जाणे आणि घरच्या भाकरी खाणे ! गावोगावी डबा पार्टीची चर्चा..

कॉंग्रेसमध्ये तिकीट मिळविण्यासाठी खूप कसरत करावी लागते. गेल्यावेळी विधानसभेच्या तिकिटासाठी मुलाखती झाल्या पण निरोप काही येत नव्हता. मध्यरात्री एक वाजता माझे तिकीट फायनल झाले तर प्रणिती शिंदे यांना दोन वाजता तिकीट अंतिम झाल्याचा निरोप आला, असा किस्साही देशमुख यांनी यावेळी सांगितला.

डिजिटल सदस्य नोंदणीमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांची नावे थेट सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून औरंगाबाद जिल्हा टॉप फाईव्हमध्ये आणा, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले.

आढावा बैठकीत डिजिटल सदस्य नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यातून एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असताना आत्तापर्यंत एक लाखाचा आकडा देखील ओलांडता आला नाही. त्यामुळे उर्वरित महिनाभरात चांगले काम करा, असे आवाहन देखील करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com