Ambadas Danve : मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच महिला, नागरिक सुरक्षित नाहीत...

पूर्वी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक होता, मात्र आता अपहरण, अत्याचाराच्या घटना व सत्ताधारी लोकप्रतिनिधीकडून धमकी देण्याचे प्रकार होत आहेत. न्याय नेमका कोणाकडे मागायचा? (Ambadas Danve)
Cm Shinde-Dcm Fadanvis-Opposition Leader Danve News Mumbai
Cm Shinde-Dcm Fadanvis-Opposition Leader Danve News MumbaiSarkarnama

मुंबई : राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढारलेल्या महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिला नाही. (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आणि गृहमंत्र्यांच्या नागपुरात महिला आणि सामान्य नागरिकच सुरक्षित नाहीत, तर राज्यातील जनतेची काय स्थिती असेल? असा रोखठोक सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.(Maharashtra)

महाराष्ट्रात दिवसाढवळ्या अपहरण, बलात्कार, लूटमार, फसवणुकीसारख्या घटना घडत आहेत. (Devendra Fadanvis) शिंदे सरकारच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, अशी टीकाही दानवे यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावातील कायदा सुव्यवस्था विषयावरील भाषणात बोलताना केली.

एकीकडे गृहमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या नागपूरमध्ये पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ठाणे जिल्ह्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली ? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? पोलीस ठाण्यात अशी घटना होणे ही राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

ठाणे जिल्ह्यातच डान्सबार सुरू असल्याचे माध्यमांनी स्टिंग ऑपरेशन करून समोर आणले. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या जिल्ह्यातच मुली व महिला सुरक्षित नाहीत, ही राज्यासाठी लाजिरवाणीबाब आहे. अल्पवयीन मुली, महिला यांच्यावरील अत्याचाराच्या घटनेत गेल्या दोन महिन्यात वाढ झाली, तर भंडाऱ्याच्या घटनेने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी देखील दानवे यांनी केली.

राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यस्था पाहता मोठया संख्येने पोलीस भरती तातडीने करावी तसेच कार्यरत पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्यावर समुपदेशन करणे गरजेचे आहे. यासाठी सरकार पावले उचलणार का? असा प्रश्नही दानवे यांनी विचारला. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा मांडतांना दानवे म्हणाले, कात्रज येथे एका मंत्र्याच्या गाडीवर दगडफेक झाली तेव्हा ते प्रकरण न्यायालयात गेले असता पुरावे नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. तरी शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले.

Cm Shinde-Dcm Fadanvis-Opposition Leader Danve News Mumbai
भाषणात अडथळा आणणाऱ्या अभिमन्यू पवारांना देशमुखांनी दिल्या मंत्रीपदासाठी शुभेच्छा..

याउलट दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार दिवसाढवळ्या सरकारी अधिकारी,पुरवठादार कंत्राटदार यांना धमकावत आहे. तसे पुरावे माध्यमांकडे व व्हिडीओ स्वरूपात आहे. मात्र सरकार त्यावर तपासून बघू असे म्हणत आमदारांना सुरक्षा कवच देत आहे. हा सरकारचा दुटप्पीपणा असून त्यांचे पितळ यामुळे उघडे पडले.

पूर्वी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक होता, मात्र आता अपहरण, अत्याचाराच्या घटना व सत्ताधारी लोकप्रतिनिधीकडून धमकी देण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे न्याय नेमका कोणाकडे मागायचा? सरकार यावर काय भूमिका घेणार? लोकप्रतिनिधींकडून राज्यात दादागिरीचा प्रकार होत आहे. त्या संबंधित चार आमदारांवर कडक कारवाईची मागणी दानवे यांनी केली.

दिवसेगणिक सायबर गुन्हे वाढत आहेत, सरकारने त्यावर बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच टेक्नॉलॉजीचा वाढत असलेला वापर पाहता भविष्यात सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. मात्र ते प्रतिबंध करण्यासाठीची शासकीय यंत्रणा कमकुवत असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com