Ambadas Danve : पक्ष फोडा आणि राज्य करा, ही भाजपची सवयच..

Shivsena : गिरीश महाजन यांनी काही नवे सांगितले नाही, शिवसेना फोडण्यात भाजपचा हात होता हे स्पष्ट झाले आहे.
Opposition Leader Ambadas Danve news, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve news, AurangabadSarkarnama

Maharashtra Politics : राज्यात सत्तांतर झाले तेव्हा भाजपने याच्याशी आमचा काही संबंध नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना फोडण्यात भाजपचाच हात होता हे नंतर सिद्ध झाले. इतरांचे पक्ष फोडायचे आणि सत्ता भोगायची ही (Bjp)भाजपची सवयच आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

Opposition Leader Ambadas Danve news, Aurangabad
kailas Gorantyal : तुम्हारा तो वक्त आया है, हमारा दौर आयेगा...

यवतमाळ येथील महाआक्रोश मोर्चानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली (Shivsena) शिवसेनेने चांगले काम केले आहे, त्यामुळे भाजपच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता मुंबईकर भाजपला निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. (Maharashtra)

भाजपला पक्ष फोडण्याची सवयच आहे. मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये हे दिसून आले आहे. स्वतःची सत्ता नसेल त्या राज्यात इतर पक्षांना फोडायचे आणि सत्ता मिळवायची, एका अर्थाने फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती राहिली आहे.

सुरुवातीला भाजपने महाराष्ट्रात मी नाही त्यातली असे दाखवले, पण नंतर स्वतः फडणवीस यांनीच त्यांनी कोणाला फोन केले होते हे सांगितले. फडणवीस कसे वेशांतर करून भेटायला जात होते, याचा खुलासा फडणवीसांच्या पत्नीनेच केला होता. त्यामुळे गिरीश महाजन यांनी काही नवे सांगितले नाही, शिवसेना फोडण्यात भाजपचा हात होता हे स्पष्ट झाले आहे, असेही दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com