Ambadas Danve On Patole : जगतापांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली, मग आम्ही नाही म्हणायचे का ?..

Congress : अनेक पक्षातील नेते, पदाधिकारी हे तिथल्या राजकीय परिस्थितीनूसार पक्ष बदलत असतात.
Ambadas Danve On Patole, News
Ambadas Danve On Patole, NewsSarkarnama

Shivsena : काॅंग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाडच्या सभेत शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. यावरून काॅंग्रेस आणि ठाकरे गटात कुरबुरी सुरू झाल्या आहेत. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहल जगातप यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली, अशावेळी आम्ही काय करायचे? त्यांना नाही म्हणायचे का?

Ambadas Danve On Patole, News
Asaduddin Owasi News : लोकसभा आम्ही पुन्हा लढणार आणि जिंकणार..

एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्यांना प्रवेश दिला यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही? अशा शब्दात दानवे यांनी नाना पटोले (Nana Patole) यांची नाराजी किंवा तक्रार चुकीची असल्याचे म्हटले आहे. स्नेहल जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देवू नका, असे आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते, असा दावा (Congress) काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.

शिवाय राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात ज्या ज्या काॅंग्रसे पदाधिकारी, नेत्यांना प्रवेश दिला ते सगळे नेते आम्हाला परत करा, अशी भूमिका देखील व्यक्त केली. (Shivsena) यावरून महाविकास आघाडीतील राजकारण पेटले आहे. यावर अंबादास दानवे यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून राजकीय पक्ष म्हणून जर कुणी आमच्याकडे येत असेल तर त्याला नाही कसे म्हणणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थितीत केला.

दानवे म्हणाले, अनेक पक्षातील नेते, पदाधिकारी हे तिथल्या राजकीय परिस्थितीनूसार पक्ष बदलत असतात. काही दिवसांपुर्वी खेडचे माजी आमदार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. स्नेहल जगताप या देखील धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत, त्या महाडच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्यांनी शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर आम्ही त्यांना नाही म्हणायचे का? एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही जो कोणी आमच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करेल, त्याला सोबत घेणारच. त्यामुळे स्नेहलताईंना शिवसेनेने आपल्या पक्षात प्रवेश दिला यात काही वावगे नाही, याचा पुनरुच्चार देखील दानवे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in