Shivsena News : अंबादास दानवे आता जिल्ह्याचे नाही, राज्याचे झाले आहेत ; ठाकरेंकडून कौतुक

Aditya Thackeray : राज्यातील सत्तांतरानंतर आमदार अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली.
Aditya Thackeray-Ambadas Danve News, Aurangabad
Aditya Thackeray-Ambadas Danve News, AurangabadSarkarnama

Marathwada : अंबादास दानवे हे आता फक्त तुमच्या जिल्ह्यापुरते राहिलेले नाहीत, ते आता राज्याचे झाले आहेत, अशा शब्दात युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर स्तुतीसमुने उधळली. कुठेही संकट असो, महिलांवर अत्याचार झाला असेल, माझा किंवा उद्धव साहेबांचा फोन येतो तेव्हा दानवे तिथे पोहचलेले असतात, लोकांची मदत करत असतात अशी कौतुकाची थाप देखील ठाकरे यांनी दिली.

Aditya Thackeray-Ambadas Danve News, Aurangabad
Aditya Thackeray : ईडा-पिडा टळू दे.. आदित्य ठाकरेंचे शनिदेवाला साकडे..

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Shivsena) रांजणागांव शेणपूंजी येथे टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना थोडक्यात मार्गदर्शन केले.

ते करत असतांना त्यांनी अंबादास दानवे यांच्या कामाचा उल्लेख करत ते आता राज्याचे नेते झाले आहेत, असे स्पष्ट केले. राज्यातील सत्तांतरानंतर आमदार अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख, आमदार म्हणून दानवे यांची केलेल्या कामाची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती.

त्यानंतर झालेल्या मुंबईतील पावसाळी आणि नागपूरातील हिवाळी अधिवेशनात दानवे यांनी सत्ताधारी पक्षांची सभागृहात पिसे काढली होती. राज्यातील शेतकरी, तरुण, महिलांची सुरक्षा यासह विविध विषयांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरल्याचे आपण पाहिले.

दानवे यांच्या या कामगिरीची दखल ठाकरे पिता-पुत्रांकडून देखील घेतली जात असल्याचे आदित्य यांच्या विधानातून स्पष्ट होते. आज दानवे हे राज्याचे नेते झाले आहेत, असे जाहीर वक्तव्य केल्यामुळे अंबादास दानवे यांचे वजन मातोश्रीवर वाढल्याचे दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com