Ambadas Danve News : शिंदेजी बाळासाहेबांच्या विचारांवरील आपली निष्ठा बेगडीच..

Shivsena : दानवे यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
Ambadas Danve-Eknath Shinde News, Aurangabad
Ambadas Danve-Eknath Shinde News, AurangabadSarkarnama

Aurangabad : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारांचा दाखला मुख्यमंत्र्यांकडून दिला जातो. शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या अश्विनी जगताप यांना पाठिंबा आहे, मात्र प्रचार सभेच्या बॅनरवर कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही.

Ambadas Danve-Eknath Shinde News, Aurangabad
Eknath Shinde News : मुख्यमंत्री म्हणाले मी थकतच नाही, रात्री बारा वाजता हाॅटेलचे उद्घाटन..

यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. (Shivsena) अश्विनी जगताप यांच्या प्रचार सभेचा फोटो ट्विट करत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) टोला लगावला.

दानवे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जात असल्याचे मिंधे गट घसा कोरडा करून सांगतो. ज्या व्यासपीठावर भाषण करता, तिथे बाळासाहेबांचा एक फोटो नाही. अशा व्यासपीठावर भाषणाला जाताना आपले पाय थांबले नाहीत, कारण आपली या विचारांवरील निष्ठा बेगडीच आहे एकनाथ शिंदेजी.

दानवे यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर त्यांच्याकडून बाळासाहेबांचे विचार हीच खरी आमची संपत्ती आहे, आम्हाला इतर कुठल्याही संपत्तीचा मोह नाही, असे सांगितले जाते. परंतु ज्या बाळासाहेबांचे नाव, विचार, पक्ष आणि चिन्ह देखील शिंदेना मिळाले. त्या शिंदेंनाच बाळासाहेबांचा विसर पडला, असा आरोप दानवे यांनी या ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com