Ambadas Danve News : `आप` चे दोन मुख्यमंत्री ठाकरेंना भेटले, त्याचा तर हा जळफळाट नाही ना ?

Maharashtra : या भेटीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Ambadas Danve On Sisodiyas Arrest News, Marathwada
Ambadas Danve On Sisodiyas Arrest News, MarathwadaSarkarnama

Shivsena : आम आदमी पक्षाचे दिल्ली सरकारमधील उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodiya) यांना सीबीआयने अटक केली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखील त्यांना अटक झाल्यानंतर मुंबईत आप ने जोरदार आंदोलनही केले. या अटकेच्यावरून आप आणि भाजपमध्ये जुंपलेली असतांनाच या वादात आता ठाकरे गटाने देखील उडी घेतली आहे.

Ambadas Danve On Sisodiyas Arrest News, Marathwada
Imtiaz Jalil : `तुम्हारा जी-२०, मेरा टी-२०`, भाजपला इम्तियाज यांचा पुन्हा इशारा..

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत यावरून भाजपला टोला लगावला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपुर्वी (Aam Admi Party) आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे भगवंत मान हे दोघेही मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटले होते. या भेटीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

त्यानंतर मनीष सिसोदिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली. अंबादास दानवे यांनी या दोन घटनांचा संदर्भ देत भाजपवर टीका केली आहे. दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, खरं तर आम आदमी पक्षाच्या सिसोदिया यांची अटक म्हणजे हुकूमशाहीचा अजून एक नमुना आहे.

उद्धव ठाकरे साहेबांना आम आदमी पार्टीचे दोन मुख्यमंत्री महाराष्ट्रात आल्यावर भेटले. त्यावर झालेला जळफळाट म्हणजे ही अटक आहे. विरोधकांचे किती ते भय असावे, स्पष्ट दिसतंय ! असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in