Ambadas Danve News : मग सांगा, मोदी सरकारच्या धोरणांचा लाभ कोणाला ?

Farmer : दुसरीकडे बांगलादेशात १००० रुपयांच्या द्राक्षाला १२०० रुपयांचा आयात कर भरावा लागतो आहे.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या कांदा, हरभरा, कापूस, द्रांक्ष या फळ आणि पिकांचा विषय गाजतोय. (Farmer) शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे त्याच्यावर शेतातच नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. कांदा रस्त्यावर फेकून दिला जातोय, यावरून केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली जात आहे.

Ambadas Danve News
Sandipan Bhumre News : नाथषष्ठीच्या पुजेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण

विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना या संदर्भात सभागृहात जाब विचारला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर थेट मोदी (Pm Modi) सरकारच्या धोरणांचा लाभ नेमका कोणाला? असा सवाल उपस्थितीत केला आहे. (Budget Session) शेतकऱ्यांच्या पीकांचे कवडीमोल भावामुळे होत असलेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी दानवे यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

दानवे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, इगतपुरीत एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कोबी पिकावर थेट नांगर फिरवला. दुसरीकडे बांगलादेशात १००० रुपयांच्या द्राक्षाला १२०० रुपयांचा आयात कर भरावा लागतो आहे. न देशांतर्गत लाभ न निर्यातीत फायदा. मग सांगा मोदी सरकारच्या धोरणांचा लाभ कोणाला? यासाठी बांगलादेशला जाब कोण विचारणार? असा सवाल देखील दानवे यांनी केला आहे.

कांद्याला एका किलोला एक रुपया भाव मिळत असल्याकडे लक्ष वेधतांना काय गत करून ठेवली आहे कांदा उत्पादकांची.. या एका रुपयात त्याच्या मुलाला लागणारी साधी पेन्सिल तरी येते का? आणि त्याने यात संसार चालवावा, ही तुमची अपेक्षा! हातात रुपया देणे म्हणजे हक्क मागणाऱ्याला भीक देणे आहे. शेतकरी याचे उट्टे नक्की काढेल, असा इशारा देखील दानवे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com